शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील इनामगाव नलगेमळा येथे घराच्या बाहेरील ओट्यावर झोपलेल्या ९० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ओढत उसाच्या शेतात नेले यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचे धड सापडले असून शीर अद्याप सापडले नाही.
वीस दिवसांपूर्वी नलगेमळा येथील ग्रामस्थांनी वन विभागाला येथे बिबट्याचा वावर असून पिंजरा लावण्याची मागणी केली परंतु याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने वृद्ध महिलेचा बळी गेला आहे आणखी किती बळी वनविभाग घेणार आहे असा सवालही नागरिकांमधून होत आहे.
वन विभाग व नागरिक महिलेचा शिर शोधत आहे.
तर बिबट्याचे सतत होणारे पूर्व भागातील हल्ल्यामुळे या अगोदर तीन लहान चिमुकल्यांचाही मृत्यू झाला आहे.
पिंपळसुटी व मांडवगण फराटा तेही अशाच प्रकारे बिबट्याने हल्ला करून शीर वेगळे व धड वेगळे केले होते. तसाच हल्ला पुन्हा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागात तातडीने वन विभागाने पिंजरावा लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तर या आल्यानंतर काही बिबटे जर बंद करण्यात वन विभागाला यश आले असले तरी या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून शेतात काम करणारे शेतमजूर, महिला ,नागरिक ,शालेय विद्यार्थी यामुळे भयभीत झाले आहे.
लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ९० रा. नलगेमळा इनामगाव ता शिरूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
शिरूर तालुक्यातील नलगे मळा इनामगाव येथील वृद्ध महिला लक्ष्मीबाई या वाढत्या तापमानामुळे घराच्या ओट्यावर झोपल्या होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने या वृद्ध महिलेवर हल्ला करून महिलेला उसाच्या शेतात ओढत नेले यावेळेस वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या मुलाने खिडकीतून डोकावून पाहिले असत
बिबट्या त्यांच्या आईला घेऊन उसाच्या शेतात गेला होता त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने वृद्ध महिलेचा शोध घेतला असता महिलेचे धड उसाच्या शेतात सापडले परंतु शीर सापडले नाही.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जातीय मात्र नागरिक बिबट्याच्या हल्ल्यानंतर ग्रामस्थ व कुटुंबीय आक्रमक झाले असून, वनविभागाने तातडीने या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी सध्या ग्रामस्थांनी केलीय.
घटना स्थळाला तातडीने वन विभागाने भेट देऊन वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील रुग्णालयात नेण्यात आला वनपाल भानुदास शिंदे यांनी सांगितले.
शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी भेट दिली असून, या परिसरात तातडीने पाचपिंजरे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच या भागात ड्रोन येऊन ड्रोन च्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
२० दिवसापूर्वी वन विभागाला बिबट्याचा नलगेमळा परिसरात वावर आहे त्याचा बंदोबस्त करा असे पत्र दिले होते, शेवटी एक जीव गमवावा लागला.आता तरी जाग येईल का? वनविभागाला असा सवाल करण्यात आला.
गणेश साळुंखे, इनामगाव
शासनाने वन संरक्षण कायदा रद्द करावा अशी मागणी जोर धरत असून सततच्या असल्यामुळे आणखी किती जणांचा बळी घेतला जाणार आहे असा संतप्त सवाल ही करीत आमच्या घरातील लोक बिबट्याच्या हल्ल्यात मरत आहेत. तुम्ही तर परदेशातून देशामध्ये जनावरे आणत आहात. जोपर्यंत तुमच्या घरातील एखाद्या माणूस बिबट्याच्या हल्ल्यात जात नाही तोपर्यंत तुम्हाला हल्ल्यात माणूस मेला हे कसे कळणार असा सवाल ही करण्यात आला आहे.
बाळासाहेब घाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी संघटना,