कारेगाव ता शिरूर येथे मोटर दोन मोटर सायकलचे समोरासमोर झालेल्या धडकेत शिरूरच्या तरुणाचा मृत्यू
शिरूर प्रतिनिधी
कारेगाव ता. शिरूर येथील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत विरुद्ध दिशेने आलेल्या मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लक्ष्मण नामदेव रासकर ( रा.रामलिग शिरुर ता.शिरुर जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
विशाल सुरेश रासकर (वय 34 वर्षे रा. रामलिंग शिरूर ता.शिरुर जि.पुणे) या युवकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता कारेगाव येथील लक्ष्मीनारायण मंदिरासमोरून जाणाऱ्या पुणे ते अहिल्यानगर रोडवर विशाल रासकर हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल नंबर एम.एच १२ टी.टी ९१२१ ही स्वताः शिरूर ते पुणे असे राँग साईटने भरधाव वेगात रहदारिचे नियमाकडे दुर्लक्ष करून घेवुन जात असताना पुणे बाजूकडून शिरूर बाजुकडे जाणाऱ्या मोटार सायकल नं एम.एच १२ यु.बी ४४१८ हिरो स्पेल्डर हिस ठोस देवुन झालेल्या अपघातात विशाल रासकर याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.
रामलिंग शिरूर चे माजी उपसरपंच सुरेश रासकर यांचे ते चिरंजीव होते