शिरूर प्रतिनिधी
करडे ता. शिरूर येथे पैशाच्या वादावरून पिस्तूल रोखून जीव मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले असून त्याच्याकडून एक पिस्तूल एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
दीपक संपत नवले (वय २३ रा. करडे ता. शिरूर ) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
महेश रोडे (रा करडे ता. शिरूर ) यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता कर्डे गावात महेश रोडे व दीपक नवले यांचेत प्लॉटींग चे व्यवहाराचे पैशावरून वादविवाद झाल्याने दीपक नवले याने फिर्यादी महेश रोडे याचेवर पिस्टल उगारले व पिस्टल मागे पुढे करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाले असल्याने. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला असता आरोपी दीपक नवले हा करडे गावात येणार असले की गोपनीय माहिती या पाठकाला मिळाली या पथकाने करडे गावात जाऊन आरोपीला मोठ्या सीताफिने अटक केली असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, व एक जिवंत काडतूस सापडले. आरोपी दीपक यांनी हा गुन्हा केल्याची कबूल केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी दीपक नवले याला शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.