शिरूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले
शिरूर, दिनांक प्रतिनिधी
शिरूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 134 वी जयंती निमित्त धम्म पूजा, धम्मवंदना,बुद्धवंदना, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून... भव्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता व मोठ्या प्रमाणात अभिवादनासाठी भीम अनुयायांबरोबर इतर धर्मियांनीही मोठी गर्दी केली होती.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती च्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
शिरूर शहरातील एस टी स्टँड समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील पूर्णाकृती पुतळ्यास शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते
पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
शिरूर नगर परिषदे, वीज वितरण कंपनीच्या वतीने वतीने ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी केली.
आज सकाळी बौद्ध धर्मियांच्या वतीने शिरूर बसस्थानकासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धम्मवंदना,बुद्धवंदना,यावेळी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती च्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष निलेश जाधव,रामभाऊ झेंडे,सचिव प्रा.विनोद शिंदे,सहसचिव प्रवीण दामोदर, माजी नगरसेविका माया गायकवाड, प्रा.शरद गायकवाड,प्रमोद गायकवाड, प्रा.रमेश गायकवाड, आदी यावेळी उपस्थित होते.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते, हजारो भीम अनुयायी या वेळेस उपस्थित होते,
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे हे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कृती समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले,
तर चाबुकस्वार कुटुंबीयांनी व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती.