अहो शिरूर वीज वितरणाचे साहेब...... तुमच्या घरी वृद्ध किंवा आजारी नागरिक नाहीत का? तुमच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला किती त्रास होतो... सलग सहातास विज बंद करून काम करण्यापेक्षा रोज थोडे थोडे केले तरी चालेल झाडे तोडायचे आहेत ना.... आमच्या जीवाशी का खेळ करता - वृद्ध व आजारी नागरिक
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर वीज वितरण कंपनीकडून आज सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ट्री कटिंग साठी वीज बंद असल्याचे सांगितले परंतु ऐन उन्हाळ्यात वीज वितरण कंपनीने दुपारी तीनचा शब्द नपाळता सलग पाच ते सहा तास त्यापेक्षा जास्त वेळ वीज बंद करून आजारी, वृद्ध नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला आहे अशा विविध वितरण अधिकारी शिरूर शहरातील नागरिकांच्या कडून निषेध केला आहे.
अहो शिरूर वीज वितरणाचे साहेब...... तुमच्या घरी वृद्ध किंवा आजारी नागरिक नाहीत का? तुमच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला किती त्रास होतो... सलग सहातास विज बंद करून काम करण्यापेक्षा रोज थोडे थोडे केले तरी चालेल झाडे तोडायचे आहेत ना.... आमच्या जीवाशी का खेळ करता -वृद्ध व आजारी नागरिक यांचा वीज वितरण अधिकाऱ्याला सवाल...
दरवर्षी अशाच प्रकारे शहरातील मोठ्या प्रमाणात शेकडो झाडे वीज वितरण वाहक तारांच्या मध्ये येत असल्याने नगरपालिकेला हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व कटिंग केली जात आहे.
ऐन उन्हाळ्यात हा वृक्षतोड व वृक्ष कटिंग कार्यक्रम वीज वितरण कंपनी करत आहे. यासाठी झाडे लावा झाडे तोडा असे ब्रीद वाक्य वीज वितरण कंपनी व शिरूर नगर परिषदेचे झाले आहे.
ऐन उन्हाळ्यात जीवाची लाही होत असताना सलग पाच तास वीज घालून हा खटाटोप वीज वितरण कंपनी शिरूर नगर परिषदेला हाताशी धरून करत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरण व उन्हाचा कडाका 39° ते 40° च्या दरम्यान गेला आहे. एकीकडे जीवाची लाही होत असताना घरात वीज नसल्याने घरातील आजारी व वृद्ध नागरिकांचे मोठे हाल होत आहे. याकडे लक्ष देण्यासाठी वीज वितरण कंपनीला वेळ नाही तर याची देणे घेणे ही नाही.
त्यात सलग पाच तास वीज गेल्याने त्याचा फटका पाणीपुरवठा करतानाही होत आहे त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे . अनेक भागांमध्ये सलग सहा तास तीस गेल्याने पाणीपुरवठा होणार नसल्याचे नगर परिषदेने जाहीर केले आहे.
या अगोदर शिरूर वीज वितरण कार्यालयाला कनिष्ठ अभियंता होते परंतु ते सकाळी आठ ते दुपारी बाराच्या आत मध्ये अशाप्रकारे झाडे छाटणी करत होते. परंतु आता आलेले नवीन अधिकारी मोठे महाशय आहेत. त्यांना वीज वितरण करताना किंवा झाडे तोड करताना कुठलेही नियम नाही. सर्व नियम धाब्यावर बसून ही झाडे तोड किंवा झाडे कटिंग केली जात आहे.
यामुळे शिरूर शहरातील नागरिकांना शिरूर वीज वितरण कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्याचा शिरूर शहरांच्या नागरिकांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
वीज वितरण अधिकारी यांच्या घरी कोणी आजारी असेल किंवा वृद्ध असेल तरच त्याला कळले अन्यथा पालथ्या घड्यावर पाणी.... शिकले तेवढे....*****असेच म्हणावे लागेल...