शिरूर तालुक्यातील घोड धरणातून होणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिवसेना शेतकरी व नागरिकांचा विरोध

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील घोड धरणातून होणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिवसेना शेतकरी व नागरिकांचा विरोध


शिरुर प्रतिनिधी

        शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणामधून नगर तालुक्यातील गावांसाठी होणा-या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिरूर तालुक्यातील मुळ लाभार्थी शेतकरी यांच्याकडून विरोध होत असुन हि योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शेतकरी ग्रामस्थांच्या वतिने देण्यात आला आहे . शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस तीव्र विरोध सुरू केला आहे. घोडधरणातील पाण्याचा प्रश्न पेटणार?

         याबाबतचे निवेदन शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना दिले आहे.

      यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख अनिल पवार,शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील तालुकासल्लागार संतोष काळे,शेतकरी सुभाष पवार,हरीचंद्र पवार,संदीप सुर्यवंशी,प्रदीप काळे,माऊली नागावडे,वसंत रोकडे,अनिल ओव्हाळ पाटील उपस्थित होते.

      शिरुर तालुक्यातील चिंचणी गावात घोड धरण असून या धरणाचा पाणीसाठा सुमारे 7 TMC आहे.या धरणाचे पाण्यामुळे शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावे जलसिंचनाखाली आलेली आहेत,या धरणामधून दोन कालवे असून एक श्रीगोंदा तालुक्यातील गावातील मुळ लाभार्थ्यांसाठी आहे तर दुसरा शिरुर तालुक्यातील शेतक-यांसाठी,तसेच याच धरणामधून पंचतारांकित रांजणगांव औदयोगिक कंपन्यांना पाणी पुरवठा होत आहे तसेच अनेक पिण्याच्या पाणीपुरवठा योजना असून अनेक शेतक-यांच्या उपसा जलसिंचन योजना आहेत.

उन्हाळयामध्ये धरणातून होत असलेल्या कालव्यातील आवर्तनांना मुळात आताच मोठया प्रमाणात अडचण येत असून मे महिन्यात पिके अडचणीत येत असतात,अशातच आता नवीन साकळई उपसा जलसिंचन योजनेला शासनाने परवानगी दिली असल्याचे दिसून येत आहे.

      या योजनेमुळे नगर तालुक्यातील वाळकी,चिखली अशी ३२ गावे ओलिताखाली आणण्याचा सरकारचा मानस दिसून येत आहे.या उपसा सिंचन योजनेसाठी 1.8TMC म्हणजेच सुमारे 2TMC पाणी लागत आहे,या योजनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च होऊन देखील योजनेचे हेतू सफल होण्याबद्दल शांशकता निर्माण होत आहे.कारण आडताच नाही तर पोह-यात कोठून येणार? आधीच या धरणातून पाण्यासाठी आदळआपट चालू आहे त्यामुळे सरकारने नाहक अशा पद्धतीचा खर्च करु नये,त्यापेक्षा कुकडी कालव्यातून विसापूर धरणात पाणी सोडून त्यातून सदर योजना राबविल्यास जास्त लाभादायक व कमी खर्चात यशस्वी योजना राबवता येईल.

       साकळाई जलसिंचन योजनेमुळे या धरणावर अवलंबून असलेले शिरूर तालुक्यातील मुळ धरणग्रस्थ,चिंचणी, शिंदोडी, वडगांव यांनाही याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे तसेच या धरणाच्या दोन्ही कालव्यांवरचे मुळ लाभार्थी शेतकरी देखील अडचणीत येणार यात तिळमात्र शंका नाही.

त्यामुळे सदर साकळाई जलसिंचन योजनेस स्थानिक शेतकरी तसेच दोन्ही कालव्यांवरील अवलंबून असलेले शिरुर व श्रीगोंदा तालुक्यातील मुळ लाभार्थी शेतकरी यांचा विरोध असून शासनाने ही योजना बळजबरीने लादल्यास मोठया प्रमाणात शेतकरी जनआंदोलन करतील याची दक्षता शासनाने घ्यावी असे निवेदन शेतकरी यांच्या वतिने तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले या 

                     

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!