तळेगाव ढमढेरे येथे 22 वर्षे नवविवाहितेची इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

9 Star News
0

 चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या

शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरेतील खळबळजनक घटना


शिरूर( प्रतिनिधी ) 

       तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे पती व सासूच्या नणंदेच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली असून, शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पती सासू नणद या तिघांवर विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोर्णिमा गणेश धोत्रे (वय २२ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) या विवाहितेने आत्महत्या केली आहे.

      पोलिसांनी विवाहितेचा पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे (दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे), नणंद सोनाली लखन ननवरे (रा. खर्डा ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

         

            विवाहितेचे वडील रामदास गेनबा जाधव (वय ५० वर्षे डोंगरगाववाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

                याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे राहणाऱ्या पोर्णिमा धोत्रे हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता, विवाहानंतर पोर्णिमाचा पती गणेश, सासू मंगल तसेच नणंद सोनाली हो पोर्णिमाला किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत तू केलेले जेवण जास्त बनवते ते वाया जाते, तुझ्यामुळे आमची बरबादी झाली, तू आमच्या घरातून निघून जा असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते, वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने तसेच होणाऱ्या त्रासाला कंटाळून ३० मार्च रोजी पोर्णिमा हिने घराला बाहेरुन कडी लावून इमारतीच्या छतावर जाऊन चौथ्या मजल्यावरुन उडी मारली, दरम्यान पोर्णिमा गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान पोर्णिमा हिचा मृत्यू झाला, याबाबत विवाहितेचे वडील रामदास जाधव यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती गणेश, सासू मंगल , नणंद सोनाली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत गणेश तानाजी धोत्रे व मंगल तानाजी धोत्रे या दोघांना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!