शिरूर तालुक्यातील वाजेवाडी सोसायटीवर पद्मावती माता परिवर्तन पॅनलचा झेंडा
शिरूर ( प्रतिनिधी ) वाजेवाडी ता. शिरुर येथील वाजेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली असून यावेळी झालेल्या निवडणुकीत पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनल ने तेरा पैकी आठ जागा मिळवत झेंडा फडकवला आहे.
वाजेवाडी ता. शिरुर येथील वाजेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीची तेरा जागेसाठी निवडणूक पार पडत असताना बापूसाहेब गोसावी यांची बिनविरोध निवड होत बारा जागांसाठी पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनेल व ग्रामदैवत पद्मावती माता सहकार पॅनल या दोघांमध्ये सरळ लढत झाली यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनेलचे विठ्ठल चौधरी, योगेश उर्फ दादा बाळासाहेब वाजे, योगेश सर्जेराव वाजे, सत्यवान वाजे, साहेबराव वाजे, मंगल तिखे, सीता वाजे, विनोद चौधरी हे आठ उमेदवार विजयी झाले तर ग्रामदैवत पद्मावती माता सहकार पॅनेलचे रंगनाथ वाजे, नानासाहेब वाजे, दत्तात्रय भोंडवे, रूपाली वाजे हे चार उमेदवार विजयी झाल्याने पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनेलचा सोसायटीवर झेंडा फडकला, यावेळी अतितटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित करतात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला तर निवडीनंतर नवनिर्वाचित संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच पूनम चौधरी, ग्रामपंचायत सदस्य चैताली वाजे, औदुंबर भोंडवे, धर्मराज वाजे, माजी उपसरपंच नितीन वाजे, आप्पासाहेब वाजे, माजी सैनिक ज्ञानेश्वर वाजे, माऊली वाजे, किसन वाजे, कचरुनाना वाजे, गणेश वाजे, प्रकाश वाजे, हरीश वाजे, सचिन भोंडवे, माजी सरपंच कानिफ मांजरे, संतोष मांजरे, माजी उपसरपंच रामदास मांजरे, केळगावचे माजी सरपंच मनोज मुंगसे, बुर्केगावचे माजी सरपंच संतोष पवळे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी अनेकांनी एकमेकांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला.
स्वतंत्र चौकट १ –
बापलेकांची संचालकपदी वर्णी तर माजी उपसरपंच पराभूत . . . . .
वाजेवाडी येथील सोसायटी निवडणूक पार पडताना पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनेलचे वर्चस्व प्रस्तापित केले असताना या पॅनेलमधून विठ्ठल चौधरी व विनोद चौधरी हे दोघे बापलेक सोसायटीचे संचालक झाले तर विरोधी पॅनेलकडून उमेदवार असलेले माजी खासदार गिरीश बापट यांचे स्विय सहाय्यक असलेले माजी उपसरपंच अमित सोनवणे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
फोटो खालील ओळ – वाजेवाडी ता. शिरुर सोसायटीच्या निवडणुकीनंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.