तळेगाव ढमढेरेत स्कार्पिओची दुचाकीला धडक शिक्षकाचा मृत्यू.. तर एक जखमी
शिरूर प्रतिनिधी
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे भरधाव वेगाने आलेल्या एका स्कॉर्पिओची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालक शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याच वेळेस स्कार्पिओ पादचारी यालाही धडक देऊन जखमी केले आहे. याबाबत स्कार्पिओ चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष लोखंडे संतोष सुखदेव लोखंडे( वय ४४ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे) यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर जयसिंग बाबुराव येडलापुरे (वय ३४ वर्षे रा. ज्ञानेश्वरनगर तळेगाव ढमढेरे रा. शिरूर जि. पुणे) हे जखमी झाले.
याबाबत जयसिंग बाबुराव येडलापुरे (वय ३४ वर्षे रा. ज्ञानेश्वरनगर तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील शिक्षक भवन समोरून आरणगाव जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक संतोष लोखंडे हे
त्यांच्या एम एच १२ एस पी ३९५९ या दुचाकीहून चाललेले असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच १२ जे के ९९८१ या स्कॉर्पिओची संतोष यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात होऊन शिक्षक संतोष लोखंडे गंभीर जखमी झाले मात्र यावेळी भरधाव असलेली स्कॉर्पिओ पुढे जाऊन रस्त्याचे कडेला असलेल्या जयसिंग येडलापुरे यांच्या पायावरुन गेली, दरम्यान नागरिकांनी जखमी संतोष लोखंडे व जयसिंग येडलापुरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दुचाकी चालक आरणगाव जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक संतोष लोखंडे संतोष सुखदेव लोखंडे( वय ४४ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे) यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर जयसिंग बाबुराव येडलापुरे (वय ३४ वर्षे रा. ज्ञानेश्वरनगर तळेगाव ढमढेरे रा. शिरूर जि. पुणे) हे जखमी झाले असून याबाबत जयसिंग बाबुराव येडलापुरे वय ३४ वर्षे रा. ज्ञानेश्वरनगर तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तेजस राजेंद्र शिंदे (रा. विठ्ठलवाडी ता. शिरूर जि. पुणे) या स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अमोल चव्हाण हे करत आहे.