छत्रपती संभाजी राजेंचे स्मारक तीर्थक्षेत्र होईल – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेंनी घेतले छत्रपती संभाजी महाराज समाधीचे दर्शन
शिरूर ( प्रतिनिधी ) वढू बुद्रुक ता. शिरुर सह तुळापुर येथे मी मुख्यमंत्री असताना चारशे कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केलेला असून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास होऊन छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे एक तीर्थक्षेत्र होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
वढू बुद्रुक ता. शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथी निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी आमदार माऊली कटके, भोसरीचे आमदार महेश लांडगे, श्री क्षेत्र सरला बेटचे महंत रामगिरी महाराज, माजी खासदार म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाह मिलिंद एकबोटे, अध्यक्ष सोमनाथ भंडारे, सचिन भंडारे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते, दरम्यान यावेळी बोलताना आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन असून हजारो शंभू भक्त या ठिकाणी माथा टेकवायला आणि अभिवादन करायला येतात, मी देखील विनम्र अभिवादन करायला आलो आहे, छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक असून त्यांचे येथे असलेले स्मारक हे तीर्थक्षेत्र होईल आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेशे असे वढू आणि तुळापूर येथे तीर्थक्षेत्र होईल त्यामुळे देशभरातून लाखो लोक येथे येऊन प्रेरणा व ऊर्जा घेऊन जातील त्यामुळे स्मारकासाठी जे काही लागेल त्यासाठी आम्ही कोठेही मागे पडणार नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
स्वतंत्र चौकट १ –
छत्रपती संभाजी महाराज समाधी दर्शन नंतर बोलताना औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचे उदात्तीकरण करणारे देखील कलंक असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ - वढू बुद्रुक ता. शिरुर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेताना एकनाथ शिंदे.