शिरूर शहरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र स्कुटी गाडीवरून आलेल्या दोघांनी ओढून नेले

9 Star News
0

 शिरूर शहरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र स्कुटी गाडीवरून आलेल्या दोघांनी ओढून नेले 


शिरूर प्रतिनिधी 

शिरूर शहरातील सी टी बोरा कॉलेज रस्त्यावर पायी चालत जात असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र किंमत १ लाख २८ हजार रुपयांचे स्कुटी गाडीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी जबरदस्तीने ओढून चोरी करून नेले आहे.

          याबाबत नंदा राजाराम घोलप (वय 58 वर्ष व्यवसाय गृहिणी रा गुजरमळा शिरूर ता. शिरूर)यांनी फिर्याद दिली आहे.

            पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादी महिला १८ मार्च रोजी पावणे आठ वाजता सिटी बोरा कॉलेजचे समोरून रोडने फिर्यादी महिला चालत जात असताना दोन अनोळखी इसम एका काळ्या रंगाच्या स्कुटी गाडीवरून येवुन गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र किंमत १ लाख २८ हजार रुपयांची जबरदस्तीने खेचुन जबरी चोरी करून मगर हॉस्पीटल बाजुकडे स्कुटी वरून पळून गेले. घटना घडल्यानंतर या प्रकारामुळे महिला आजारी पडली होती त्यानंतर तिने काल 28 मार्च रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++;;;;;;;;

सविंदणे ता शिरूर येथे मोटार सायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी वृद्ध महिलेचे गंठण लांबविले

शिरूर प्रतिनिधी 

     संविदणे ता. शिरूर येथे मोटर सायकल वर आलेल्या २० ते २५ वयातील दोघा तरुणांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण किंमत एक लाख दहा हजार रुपयाची जबरदस्ती चोरून नेले आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      याबाबत वत्सलाबाई दत्तात्रय सुके (वय 77 वर्षे रा. खडकवाडी, पोस्ट लोणी ध मणी ता. आंबेगाव जि. पुणे.) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

        शिरूर पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संविदणे ता. शिरूर मलठण-नारायणगाव अष्टविनायक हायवे रोडवरील बंटी हॉटेलचे पुढे फिर्यादी वृद्ध महिला जात असताना मोटर सायकल वर आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण किंमत एक लाख दहा हजार रुपयाची जबरदस्तीने ओढून चोरून नेले आहे याबाबत फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे करीत आहे

+++++++++++++++++++++++++++++++++++++

शिक्रापूर ता. शिरुर येथील जातेगाव रोड पाटवस्ती येथे अश्विनी भोंडवे यांचे श्रीकृष्ण सुपर मार्केट नावाने किरणा दुकान असून सकाळच्या सुमारास अश्विनी यांनी दुकान उघडल्यानंतर दुचाकीहून दोन युवक आले, त्यापैकी एक युवक दुकानापुढे दुचाकी घेऊन उभा राहिला तर एक युवक दुकानात येऊन त्याने अश्विनी यांना पाण्याची बाटली मागितली त्यावेळी त्याला पाणी बाटली देत असताना सदर युवकाने अश्विनी यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळत जाऊन दुचाकीवर बसला, यावेळी दुचाकीवर बसून दोघेजण भरधाव वेगाने निघून गेले यावेळी अश्विनी यांनी दुचाकीकडे धाव घेतली मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले, याबाबत अश्विनी रामकृष्ण भोंडवे वय ३६ वर्षे रा. पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर हे करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++

रांजणगाव गणपतीत हॉटेल चालक महिलेचे गंठण हिसकावले 

शिरूर ( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील धनगरवाडा स्नॅक्स सेंटर हॉटेल चालक वंदना शेटे या त्यांच्या धनगरवाडा स्नॅक्स सेंटर हॉटेलमध्ये असताना आलिशान दुचाकीहुन दोन युवक आले, दरम्यान एक युवक हॉटेल पुढे दुचाकी घेऊन उभा राहिला तर एक युवक हॉटेलमध्ये आले, त्याने वंदना शेटे यांना पाण्याची बाटली मागितली त्यानंतर पाणी बाटली घेतल्यानंतर पुन्हा चिक्की मागितली दरम्यान वंदना या पैसे ड्रायव्हर मध्ये ठेवत असताना सदर युवकाने वंदना यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून तो दुचाकी बसला, यावेळी दुचाकीवर बसून दोघेजण भरधाव वेगाने निघून गेले याबाबत वंदना रोहिदास शेटे वय ३३ वर्षे रा. पिंपरी दुमाला ता. शिरूर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी दोन आज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.


शिरूर 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!