सोनेसांगवी ता.शिरूर येथे सराईत गुन्हेगारांला चार गावठी पिस्तुल, बारा काडतूस, तीन मॅग्झीन सह केला जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
शिरूर दिनांक प्रतिनिधी
सोने सांगवी ता. शिरूर येथे सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चार गावठी पिस्तूल १२ काडतूस ३ मॅक्झिन असा एकूण १ लाख ८२ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यात अशा प्रकारे गुन्हेगार खुलेआम पिस्तूल घेऊन फिरत असून, यावर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची करडी नजर आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रांजणगाव परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
सुरज राजेश पाडळे (वय २७,रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि पुणे) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी, ता. शिरूर जि.पुणे), व इतर दोन मित्र असे चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २६ मार्च रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालत असताना या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सोनेसांगवी ता. शिरूर येथील सराईत गुन्हेगार सुरज पाडळे त्याच्याकडे अवैध गावठी पिस्तूल असून तो आता त्याच्या सोनेसांगवी येथील घरी आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे हे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी दोन पंचासह सोनेसांगवी येथील सुरज पाडळे यांच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी करून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने त्याचा मित्र संकेत संतोष महामुनी व इतर दोन मित्र यांनी मध्य प्रदेश येथे जाऊन पिस्तूल , काडतूस असे व मॅक्झिन खरेदी केल्याची सांगितले.
यावेळी सुरज पाडळे यांनी त्याच्याकडे चार गावठी पिस्तूल, बारा जिवंत काडतूस व तीन मॅक्झिन काढून पोलिसांना दिले आहे. त्याची किंमत १ लाख ८२ हजार एवढी असून, पोलिसांनी सुरज पाडळे, संकेत महामुनी याच्यासह आणखी दोघे असे चार जणांवर रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडून चालु वर्षात अवैध अग्निशस्त्र बाळगणारे आरोपींवर कारवाई करत एकूण ०७ अवैध अग्निशस्त्र १७ जिवंत काडतूस हस्तगत करणेत आलेले आहेत.
. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांचेकडून पुणे ग्रामीण जिल्हयाची वार्षिक तपासणी चालू असनू दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करून मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्र साठा हस्तगत करणेत आल्याने मा. श्री. पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी केली आहे
.