महाराष्ट्राला प्रेरणा देणारे स्मारक उभे राहील – अजित पवार
अजित पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन
शिरूर
( प्रतिनिधी ) वढू बुद्रुक ता. शिरुर सह तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्यासाठी सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करत कामाला सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्राला प्रेरणा देणारे स्मारक येथे उभे राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
वढू बुद्रुक ता. शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथी निमित्ताने अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी आमदार माऊली कटके, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, सोमनाथ भंडारे, सचिन भंडारे यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान यावेळी बोलताना यापूर्वी सरकार कडून वढू बुद्रुक सह तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे काम हाती घेण्यात आले असून वढू बुद्रुक येथे स्मारक शेजारी असलेल्या केईएम हॉस्पिटलच्या इमारतीमुळे अडचणी येत होत्या मात्र सध्या ती अडचण देखील सुटली असून पुण्यतिथी नंतर लवकरत येथील कामाला सुरुवात करुन सदर कामाला गती देऊन महाराष्ट्राला मनातील प्रेरणा मिळेल असे स्मारक येथे उभे केले जाणार असल्याचे देखील उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – वढू बुद्रुक ता. शिरुर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेताना अजित पवार.