न्हावरा ता. शिरुर येथे १६ वर्षीय शाळकरी मुलीला तुला शाळेत सोडतो असे म्हणून तिला आपल्या दुचाकीवर बळजबरीने बसून एका लॉजवर घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल अशोक गारगोटे (वय १९,रा. गारगोटे वस्ती न्हावरा ता. शिरूर जि. पुणे) असे अटक केलेल्या नाराधाम तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे
न्हावरा ता. शिरुर येथील अल्पवयीन महाविद्यालयीन युवती महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी चाललेली असताना गावातील कुणाल गारगोटे युवती जवळ आला त्याने युवतीशी बोलत मी तुला कॉलेजला सोडतो असे म्हणून, तरुणीला दुचाकी वर बसून दुचाकीहून युवतीला बळजबरीने शिरुर येथील एका हॉटेल मध्ये घेऊन जात युवतीवर अत्याचार केला त्यांनतर पुन्हा युवतीला न्हावरा येथे आणून सोडून देऊन कुणाल निघून गेला, याबाबत पिडीत युवतीने आपल्या पालकांना झालेल्या अत्याचाराची माहिती दिली त्यानंतर शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी कुणाल अशोक गारगोटे रा. गारगोटे वस्ती न्हावरा ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व बलात्कार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके हे करत आहे.