जांबुत ता शिरूर येथे गांजा विक्री करणाऱ्या एका जणांला शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने पकडले असून त्याच्याकडून साडेतीन किलो गांजा किंमत ३८ हजार ८४० रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
समिर हजरतअली शेख (वय ३० वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे) याला याबाबत अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक ११ मार्च रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार अंबादास थोरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की जांबुत येथे
समीर शेख हा त्याच्या घरात गांजाची विक्री करीत आहे. या माहितीप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने जांबुत ता. शिरूर जि.पुणे येथील आरोपी यांचे राहते घरी सापळा रचुन छापा टाकला असता त्या ठिकाणी समिर हजरतअली शेख (वय ३० वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे )यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ३ किलो ८४० ग्रॅम तयार वजनाचा गांजा असा एकुण ३८ हजार ८४० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टोनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलिस हवालदार भागवत गरकळ, बाळु भवर, पोलिस अंमलदार अंबादास थोरे, भाऊसाहेब ठोसरे यांचे पथकाने केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शानाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे हे करीत आहे.