शिरूर,प्रतिनिधी
सकाळी अकराची वेळ शिरूर शनी मंदिर परिसरात अचानक पोलीस गाड्या सायरन वाजवत आल्या... काही कळायच्या आत जमलेला जमाव दगडफेक करत होता तर एकीकडे पोलीस हातात काठी आणि संरक्षण घेऊन जमावाच्या दिशेने जमावाला पांगवत होता. पोलीस निरीक्षक पोलिसांना सूचना देत होते... अचानक ग्रॅनाईट टाकण्यात आले धूरच धुर झाला.....
ही परिस्थिती पाहून परिसरातील नागरिकही भयभीत झाले होते दंगल झाली का काय अशी परिस्थिती असताना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी हे दंगा काबू योजनाचे प्रात्यक्षिक असल्याचे सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
आज 27 मार्च सकाळी 11 ते साडेअकरा दरम्यान शिरूर शहरातील शनि मंदिर परिसरात शिरूर पोलिसांच्या वतीने हिंदु व मुस्लिम धर्मियांचे ईद,गुढीपाडवा , रमजान महिना, श्रीराम नवमी, हनुमान जयंती व छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास या आगामी सणाचे अनुषंगाने कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा काबु पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली .
शिरूर शहरातील या रंगीत तालमी दरम्यान पोलिसांनी खरोखर दंगा चालू आहे असे प्रात्यक्षिक दिसून आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
गाड्यांचे सायरन शिट्टी चा आवाज आणि पोलिसांना दिलेल्या सूचना तर दुसरीकडून दंगा करणारी लोक आणि पोलिसांचा त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न हा सगळा प्रकार दंगा काबू योजना सरावा दरम्यान
नागरिकांना पाहाव्यास मिळाला.
सदर दंगा काबु योजना सरावा दरम्यान 3 हॅन्ड ग्रॅनाईट खर्ची करण्यात आले. यावेळी शिरूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस उपनिरीक्षक चाळीस पोलिस अंमलदार यांच्या उपस्थिती दंगा काबू योजनेेच सराव करण्यात आला.