शिरूर प्रतिनिधी
शिक्रापूर परिसरात विद्युत रोहित्र फोडून त्याच्या आतील तांब्याच्या चारा चोरून धुमाकूळ घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून ११ लाख ९५ हजाराचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गयकवाड यांनी दिली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या या कारवाईमुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
याप्रकरणी सागर शिवराम जाधव (वय ३० वर्षे, रा.म्हाळुंगे पडवळ, ता.आंबेगाव, जि.पुणे), राजु प्रभु पारधी (वय ४० वर्षे, रा. जवळके बु।। ता. खेड, जि.पुणे),राहुल संतोष मधे (वय २५ वर्षे, रा.कडाळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), किरण गोवींद खंडागळे (वय ३० वर्षे, रा. जवळके बु।। ता.खेड, जि. पुणे) यासह चोरीचा माल विकत घेणारा व्यापारी पांडुरंग दशरथ वायकर( वय ४० वर्षे, रा.नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे ) पाच जणांना अटक केली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात विद्युत रोहित्र फोडून तारा चोरी होत होते. याबाबत अकरा गुन्हे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल असून यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. तर विद्युत रोहित्र चोरीनंतर विज गेल्याने शेतकऱ्याचे शेतीमालाचे नुकसान होत होते.
शिकापुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी याची गंभीर दखल घेत विद्युत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेणे वावत गुन्हे शोध पथकाला सुचना दिलेल्या होत्या. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, संतोष मारकड, पोलिस कॉन्स्टेबल नारायण वाळके यांचे पथक विद्युत रोहीत्र चोरीच्या गुन्हयांचा सखोल तपास सुरू करून सी.सी.टी.व्ही. फुटेजव्दारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींची माहीती काढली त्यात सागर जाधव, राजू पारधी, राहुल मधे व राहुल खंडागळे या आरोपींना अटक केली. त्यांना पॉलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व चोरलेल्या तांब्याच्या तारा नारायणगाव येथील व्यापारी पांडुरंग वायकर यालाही विकल्याचे त्यांनी कबुली जवाब सांगितले.आरोपींकडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेली १ इको कार, १ पिकअप गाडी, १ पल्सर मोटार सायकल यासह गुन्हयातील चोरलेले तब्बल १९० किलो विद्युत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा असा एकुण ११ लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आहे. तर आरोपींनी तपासामध्ये एकुण ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मारकड हे करीत आहेत.
https://youtu.be/wq5n0i3wYlI?si=2Tpcc7vLEbhbGxmpसदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली शिक्रापूर त पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, संतोष मारकड, पोलिस कॉन्स्टेबल नारायण वाळके यांचे पथकाने केली आहे.