शिरूर शहराला उद्यापासून नियमित पाणीपुरवठा होणार मुख्याधिकारी अमित पाटील
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईपासून मुक्ती मिळाली असून दिनांक 28 मार्च पासून दररोज शिरूर शहराला पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमित पाटील यांनी सांगून उन्हाळा कडक असून, पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेली काही दिवसापासून शिरूर शहराला दिवसात पाणीपुरवठा होत होता. परंतु कुकडी पाटबंधारे विभागाला विनंती केल्यानंतर
कुकडी पाटबंधारे विभाग 1 -कार्यकारी अभियंता, प्रशांत कडूसकरयांनी विनंती मान्य करून
शिरूर शहरातील कोल्हापुरी बंधाऱ्यात 61 नंबर चारीतून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शिरूर शहराला दीड ते दोन महिने पाणी पुरेल एवढा साठा उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे शिरूर नगरपरिषदेच्या वतीने दिनांक 28 मार्च पासून दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अमित पाटील यांनी सांगितले.
त्यामुळे शिरूर शहराला पाणीटंचाईपासून मुक्ती मिळाली आहे. तरीही नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा रस्त्यावर पाणी मारू नये, बांधकामाला पाणी कमी वापरावे, पाणी वाया घालू नये, पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होऊन देऊ नये ... पाणी आहे म्हणून पाण्याच्या तोट्या चालू करू देऊ नये. पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आव्हान शिरूर नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा अभियंता - आदित्य बनकर यांनी केले आहे.