शिरूर शहरातील पाटबंधारे कॉलनी व एसटी बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत कडक कारवाई करणार पोलीस अधीक्षक पंकज देशमुख

9 Star News
0
शिरूर, प्रतिनिधी 
          शिरूर शहरासाठी लवकरच स्वतंत्र पोलीस स्टेशन व तालुक्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून पोलिसांच्या वसाहती करीता ही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त करून शिरूर तालुक्यात कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पूर्णपणे पोलिसिंग करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
         शिरूर पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षणासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी आज शिरूर पोलीस स्टेशन येथे भेट दिली व कामकाजाची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिक, महिला, पोलीस पाटील व पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 
       यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, शिरूर उप विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले,, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते बापू सानप, शशिकला काळे, सविता बोरुडे, रेश्मा शेख, उपस्थित होते.
          शिरूर शहरातील बस स्थानक परिसरात व पाटबंधारे कॉलनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. तर जय प्रकार करणारे आढळल्यास कडक कारवाई करणार.
 तर शाळा कॉलेज परिसरात मुलींचा विनयभंगांच्या घटना घडल्या आहेत त्या शाळांना गट विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सूचना करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. शाळा कॉलेज परिसरात दामिनी पथक व पोलिसांचे काम चांगले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
          शिरूर तालुक्यातील एखादा गुन्हा घडत असेल तर किंवा मुलींची छेडछाड होत असेल तर 112 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी करून लवकरच शिरूर पोलीस स्टेशन हे एसटी बस स्थानकाजवळील जागेत स्थलांतर होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 
          शिरूर शहर व ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आला नागरिकांना त्यांच्या अडचणी बाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी माझ्या मोबाईल नंबर वर संपर्क साधला तरी चालेल असेही देशमुख म्हणाले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!