शिरूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात सध्या राज्यकर्त्याकडे नैतिकता आढळून येत नसून औरंगजेबाने जसा कारभार चालवला होता त्यानुसार राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार कारभार करताना दिसून येत आहे अशा कारभारांचा राज्यातील मावळ्यांनी निषेध नोंदवणे गरजेचेअसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त करून राज्यात महापुरुषांचा अपमान करा आणि संरक्षण आणि पुरस्कार मिळवा अशी परंपरा महायुती सरकारने सुरू केली असल्यास आरोपही त्यांनी केला.
शिरूर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी बीड येथे सद्भावना यात्रेकरीता जाताना शिरूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस आयचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात, शिरूर तालुका अध्यक्ष वैभव यादव ,किरण आंबेकर ,संकेत गवारी, संतोष गव्हाणे ,अमजद पठाण ललित गुगळे, अझीम सय्यद, प्रदीप महकरे ,विजय डिंबर ,अशोक भुजबळ, रामदास थोरात ,रियाज सय्यद आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना म्हणाले बीडचे वातावरण विषमतेच्या अनुषंगाने खूप विदारक झालेले आहे. काही लोकांना येथे येऊ नका असे सांगितले आहे. यामुळे एकीकडे सामाजिक विषमता तर दुसरीकडे द्वेष निर्माण झाला आहे महाराष्ट्र हा पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा आहे वारकरी संप्रदाय व आध्यात्मिक परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे परंतु जातीय विषमता बीड सारख्या भागात दिसून येत आहे ही समाजाला घातक गोष्ट असले त्यांनी सांगून मढी येथे याचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी जात असून त्यानंतर नारायण गड व भगवानगड येथे सद भावनेचे साकडे घालण्यासाठी जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.८ मार्च पासून सदभाव पदयात्रा बीड येथून सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या देशात महापुरुष जाती जातीत वाटून घेण्याचे काम सुरू आहे सध्या महाराष्ट्र पेटत असल्याचे विदारक चित्रही निर्माण झाले आहे.
औरंगजेबाने वडिलांना जेलमध्ये टाकले भावाचा खून केला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला संभाजी महाराजांची हत्या केली. त्या प्रमाणात राज्यातील देवेंद्र फडवणीस यांचे सरकार औरंगजेबाप्रमाणे कारभार करत असल्याचा आरोप करून राज्याचा कारभार अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी महायुतीचे सरकार म्हणजे मुके आंधळे बहिरे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
कराड प्रकरण असो किंवा धस यांच्या कार्यकर्त्यांचे प्रकरण असो राज्यात कायदा सुव्यवस्था चा राहिली नाही. राजीनामा मागणे हे राजकारण होत आहे परंतु नैतिकता समजून राजीनामा देणे गरजेचे आहे. लाल बहादूर शास्त्रीनी नैतिकता जपत आपला राजीनामा दिला होता, हेही राजकारण्यना समजायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर नट, महेश कोरटकर यांना राज्य शासन पुरस्कार व संरक्षण पुरवत आहे यासारखे दुर्दैव नाही. विनायक सावरकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण केले .त्यांना पुरस्कार दिला जातो . महापुरुषाचा अपमान करा सुरक्षा व पुरस्कार घ्या असे सरकार महापुरुषाचा बाबतीत करत असल्याची टीका सकपाळ यांनी केली.
तर मराठी भाषेचा अपमान करून भाजप सरकारला देशात एकच भाषा ठेवायची असल्याचा आरोपही भाजपवर केला.