कारला धडकून इसम कारवर आदळल्याने कारची मोठी दुरवस्था
( प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे अहिल्यानगर रस्त्यावर रस्ता ओलांडताना कारची धडक बसून कारवार आदळून इसम जागीच ठार होऊन एक इसम कारची मोठी दुरवस्था झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सचिन कमलाकर चक्रनारायण या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे ते अहिल्यानगर रस्त्याचे लगत असलेल्या बंद चंद्रमा हॉटेल समोरून गणेश साठे हे रस्ता ओलांडत असताना अहिल्यानगर बाजूने एम एच १४ एल यु ५१८९ हि कार भरधाव वेगाने आली यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून कारची गणेश साठे यांना जोरदार धडक बसली यावेळी गणेश जोरात कारच्या काचेवर आदळले जाऊन कार दुभाजकावर आदळली, दरम्यान गणेश साठे गंभीर जखमी होऊन गणेश रामभाऊ साठे वय ४३ वर्षे रा. पाटीलवस्ती सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांचा जागीच मृत्यू झाला, याबाबत बापू रामभाऊ साठे वय ४३ वर्षे रा. पाटीलवस्ती सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कार चालक सचिन कमलाकर चक्रनारायण रा. डांगे चौक थेरगाव पुणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.
फोटो खालील ओळ – सणसवाडी ता. शिरुर येथील अपघात दरम्यान कारची झालेली दुरवस्था.