शिरूर,प्रतिनिधी
शिरूर येथील रामलिंग पोद्दार शाळेजवळ असलेल्या राहत्या घरी १८ वर्षाच्या युवतीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
अंजली गजानन टिपरे (वय १८ वर्ष सध्या रा.-पोद्दार शाळेजवळ, रामलिंग रोड, ता.शिरूर मुळ रा.. बान्सी, ता. पुसद, जि . यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू रामदास टिपरे (वय 48 वर्षे, धंदा-वीटभट्टी मजुरी, सध्या रा. पोद्दार शाळेजवळ रामलिंग रोड शिरूर, जि. पुणे मुळ रा. बान्सी ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती.
२४ मार्च रोजी पहाटे ३ वाजता राजू टिपरे हे वीटभट्टी येथे कामास गेले होते. त्यावेळी पुतणी अंजली गजानन टिपरे वय १८ वर्षे ही देखील त्याच्या सोबत गेली होती. त्यानंतर सकाळी पावणेदहाचा सुमारास तीने कामाचा ठिकाणी चहा करून आणुन दिला व ती घरी निघुन गेली.
सकाळी साडे दहाच्या सुमारास राजू यांची मुलगी उषा वय ९ वर्षे ही रडत रडत वीटभट्टी वरती आली व तीने सांगितले की “दिदी ने घराचा दरवाजा बंद केला असून ती घराचा दरवाजा उघडत नाही” त्यावेळी राजू व त्यांची पत्नी शितल यांनी घरी जावुन पाहीले असता घराचा दरवाजा बंद होता. त्यावेळी अंजली हीला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला असता ती आतून आवाज देत नसल्याने राजू यांनी दरवाजा जोरात ढकलून उघडला असता घरामध्ये वरती असणा-या लाकडाला ओढणीचे सहाय्याने अंजली हीने गळफास घेतल्याचे दिसुन आले.
दरम्यान, तीला रुग्णवाहिके मधून उपचारा साठी ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे नेले असता. तेथील डॉक्टरांनी तपासुन उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले. याबाबतचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली राउत हे करी
त आहेत.