रांजणगाव गणपतीत हॉटेल चालक महिलेचे गंठण हिसकावले
शिरूर ( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील धनगरवाडा येथे ग्राहक म्हणून आलेल्या दोन तरुणांनी महिलेच्या गळ्यातील गंठण ओढून पोबारा केला आहे.
याबाबत रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वंदना रोहिदास शेटे वय ३३ वर्षे रा. पिंपरी दुमाला ता. शिरूर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.https://youtube.com/watch?v=OC7oENwd_cA&si=Hni-nG1YcFcaaE9o
पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील धनगरवाडा स्नॅक्स सेंटर हॉटेल चालक वंदना शेटे या त्यांच्या धनगरवाडा स्नॅक्स सेंटर हॉटेलमध्ये असताना आलिशान दुचाकीहुन दोन युवक आले, दरम्यान एक युवक हॉटेल पुढे दुचाकी घेऊन उभा राहिला तर एक युवक हॉटेलमध्ये आले, त्याने वंदना शेटे यांना पाण्याची बाटली मागितली त्यानंतर पाणी बाटली घेतल्यानंतर पुन्हा चिक्की मागितली दरम्यान वंदना या पैसे ड्रायव्हर मध्ये ठेवत असताना सदर युवकाने वंदना यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून तो दुचाकी बसला, यावेळी दुचाकीवर बसून दोघेजण भरधाव वेगाने निघून गेले याबाबत वंदना रोहिदास शेटे वय ३३ वर्षे रा. पिंपरी दुमाला ता. शिरूर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी दोन आज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.