शिरूर १७ कामानी जवळ बुलेटला अज्ञात वाहनाची धडक शिरूरच्या ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
शिरूर प्रतिनिधी
शिरूरशहर पुणे अहिल्यानगर बाह्य मार्गावर सतरा कमानी पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाची बुलेट मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात बुलेटवरील ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे .
सोमेश्वर बबन पाचर्णे (वय ३२ वर्षे,पाचर्णेमळा तर्डोबाचीवाडी ता शिरुर जि पूणे) हा या अपघातात मरण पावला आहे.
याबाबत बाळु शंकर पाचर्णे ( पाचर्णेमळा तर्डोबाचीवाडी ता शिरुर जि पूणे)
यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २६ मार्च रोजी रात्री अकरा वाजता सोमेश्वर पाचर्णे हा त्याची बुलेट मोटारसायकल एम. एच १२ एस आर ६९१३ ही वरून पुणे अहिल्यानगर महामार्गावर अहिल्यानगर च्या बाजूने जात असताना शिरूर सतरा कमान पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या बुलेट मोटरसायकलला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात बुलेट चालक सोमेश्वर याच्या डोक्याला हातपाय गंभीर मार लागल्याने याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन व अज्ञात चालक कुठली खबर न देता पळून गेला आहे.
याबाबत फिर्यादीवरून अज्ञात वहान व त्याचा चालक याच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक राऊत करीत आहे.