शिरूर तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना , यशवंत व दिव्यांग आवास योजना आणि मोदी आवास योजना या योजनेसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी लाभार्थ्यांनी आता गुगल फॉर्मद्वारे निधी मागता येणार असल्याची माहिती शिरूर पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश डोके यांनी दिली असून यासाठी लाभार्थी यांनी बांधकामाचे प्रगती फोटो सह निधी गुगल फॉर्मद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे मागावा असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानुसार शासकीय यंत्रेद्वारे त्याची पडताळनी व Geo टॅगिंग केले जाईल व पुढील हप्ता ऑनलाइन मिळेल .
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लिंकवर करावी.https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfFFKxi7lYUqkQH7cJRCMOB8kyG8DCsbPE5gFnq_3nDGedRbg/viewform?usp=header
लाभार्थी त्यांच्या गावातून ऑनलाइन गूगल फॉर्मद्वारे घरकुल बांधकामाच्या फोटोसह अर्ज करू शकणार आहेत. या अर्जाच्या आधारे प्रशासनाला कळणार आहे की संबंधित लाभार्थ्याचे घरकुल कितपत पूर्ण झाले आहे ?,
Geotaggin साठी फोटो काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कोणत्या गावात जावे?
कोणकोणत्या गावातील घरकुलाचे बांधकाम पुढील टप्प्यात आले आहे?
आणि पुढील हप्ता मंजूर करावा का किवा कसे?त्यानुसार, ग्रामीण गृहनिर्माण अधिकारी (RHE) संबंधित गावात जाऊन Geotagging करणार आहेत, ज्यामुळे लाभार्थ्यांची घरे बांधकामासाठी निधी प्रगतीच्या टप्यानिहाय लवकर व वेळेत उपलब्ध होईल.
काय आहे नवीन प्रक्रिया?
• लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज भरावा.
• अर्ज भरताना घरकुलाच्या सद्यस्थितीचा फोटो अपलोड करावा.
फोटो मद्ये बांधकाम प्रगती व लाभार्थी स्पष्ट दिसतील असे फोटो अपलोड करावेत.
• अर्ज केल्यानंतर संबंधित अधिकारी गावात जाऊन प्रत्यक्ष Geotagging करतील.
• बांधकामाची खात्री पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता मंजूर केला जाईल.
या नवीन प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, वेळ आणि पैशांची बचत होणार आहे, तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अधिक जलद गतीने निधी मिळण्यास मदत होणार आहे.
लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वर दिलेली अधिकृत वेबसाईट किंवा लिंक गट विकास अधिकारी पंचायत समिती व ग्राम पंचायत मद्ये आणि ग्रामसेवक किवा ग्राम पंचायत अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे
प्रतेक पंचायत समिती मद्ये लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुल बांधकामाच्या टप्प्यानुसार पुढील हप्त्या मिळण्यासाठी किवा अर्ज करण्यासाठी आता शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही.
घरकुल योजनेतील लाभार्थी स्वतः बांधाकामाची प्रगती फोटोसह व पुढील टप्याची निधी मागणी गूगल फॉर्म व्दारे गटविकास अधिकाऱ्यां
कडे नोंदवू शकणार आहेत.