श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथून बेपत्ता झालेल्या माऊली सतीश गव्हाणे याचा तपास पोलिसांनी लावून, याच गावांमध्ये सापडलेल्या मृतदेहाची तपासणी करून त्याची ओळख लवकरात लवकर पटवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अखिल गोपाळ समाजाच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे निवेदन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना अखिल गोपाळ समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी अखिल गोपाळ समाजाचे अनिल परशुराम गव्हाणे, व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
माऊली सतिश गव्हाणे (वय वर्ष १९) हा दिनांक ६ मार्च २०२५ पासुन शिरूर शहर जि. पुणे येथील चांदमल ताराचंद बोरा महाविदयालय येथुन बेपत्ता असुन त्याची तक्रार आम्ही दिनांक ९ मार्च २५ रोजी शिरूर पोलिस स्टेशन येथे दिलेली आहे.
परंतु दिनांक १२ मार्च २५ रोजी दाणेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर मध्ये एका विहीरी मध्ये एक मृत्युदेह छिन्नविच्छिन्न आवस्थेत सापडला असुन त्याची ओळख आदयाप पटली नसुन हा मृत्युदेह माऊली गव्हाणे यांचा तर नाही ना अशी शंका आम्हा नातेवाईकांच्या मनात येत असुन आपण हि घटना गांभिर्याने घेऊन माऊली गव्हाणे याचा तावडतोब शोध घेऊन आम्हाला या बाबत खुलासा करावा तसेच सापडलेल्या मृत्यदेहाची ओळख पटवुन लवकरात लवकर माहीती मिळावी अशी मागणी आम्ही अखिल गोपाळ समाज महाराष्ट्र राज्य यांनी निवेदनाव्दारे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना केली आहे.