दाणेवाडी ता. श्रीगोंदा तालुक्यातील माऊली सतीश गव्हाणे या १९ वर्षीय तरुणाची क्रूरपणे हत्या झाली असून या हत्येचा तपास करण्यास स्थानिक पोलीस कमी पडले असून लवकरात लवकर या तरुणाच्या खून करणाऱ्या आरोपींचा व त्यामागील आकाचा शोध घेतला नाही तर श्रीगोंदा पोलीस स्टेशनवर सर्वपक्षीय समाज बांधवांचा संताप महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांनी दिला आहे.
तर या खून प्रकरणाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे पीए यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांनी आज दाणेवाडी येथे जाऊन सतिश गव्हाणे यांचे कुटुंब यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
ही हत्या अतिशय निर्घुण पणे केली असून, मृतदेहाचे दोन्ही हात, एक पायपूर्ण, एक पाय अर्धा तर शीर नसलेला अशा अवस्थेत त्याच्याच गावात एका विहिरीत आणून टाकला आहे. यामुळे गव्हाणे कुटुंब यांनी हा मृतदेह त्यांचा मुलगा माऊलीचा असल्याचा त्यांना संशय आहे. याबाबत मात्र पोलीस खाते उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दिवशीच अनिल परशुराम गव्हाणे या मुलाच्या चुलत्यांनी हा मृत्यू देह त्यांच्या पुतण्याचा असल्याचा सांगितले . परंतु मृतदेहास शीर हातपाय नसल्याने गव्हाणे कुटुंब द्विधा मनस्थितीत आहे.
ज्या दिवशी असा निर्घुण खून केलेला मृतदेह सापडला त्याच दिवशी त्याचे चुलते यांच्या संशयावरून डीएनए चाचणी करण्यासाठी त्याच्या वडिलांचे जे काही सॅम्पल लागत होते ते घेणे गरजेचे होते. परंतु पोलिसांना तीन दिवसानंतर जाग आल्याचे दिसून येत आहे. व डीएनए साठी सॅम्पल आज घेतले जातात. त्यामुळे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक या निर्घुण खुनाबाबत तपास करण्यासाठी रस दिसत नसल्याचे यावरून दिसत आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा झाली असून या खुनाचा तपास जलद गतीने करावा यासाठी त्यांनी व त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला असल्याचेही दौलत शितोळे यांनी सांगितले.
या खुनाचा लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारांना अटक करावी व यामागे असणारे आका यांना अटक करावी अन्यथा श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे सर्वपक्षीय समाज बांधवांचा संताप महामोर्चा काढण्यात येईल असा इशाराही शितोळे यांनी दिला आहे.