श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत व शिरूर तालुक्याच्या सीमेवर असलेले दाणेवाडी गावात काल एका तरुणाचा मृतदेह विहिरी सापडला आहे. या तरुणांच्या देहाची खांडोळी करणारे आरोपी सापडणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून अतिशय क्रूरपणे ही हत्या केली असल्याची मृतदेहाकडे पाहून वाटत आहे. या खुनाचा तपास लावणे अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांपुढे मोठे आव्हान आहे.
पोलिसांनी काही संशयित ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे समजते.
एवढ्या क्रूरपणे एका तरुणाची हत्या केली जाते आणि त्या हत्याबाबत महाराष्ट्र शासन किंवा स्थानिक आमदार खासदार मंत्री 24 तास उलटूनही भ्र शब्द काढत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
बीडच्या मस्साजोग नंतर शिरूर श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवरही दाणेवाडी ता श्रीगोंदा.येथे घडला निर्घुण खून.. तरुणाचे शीर धडा वेगळे दोन हात उजवा पाय पूर्णपणे तोडला तर डावा पाय अर्धवट तोडला... गुप्तअंगावर जखमा... नग्न अवस्थेतील मृतदेह विहिरीत टाकलेला आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचे कपडे त्याची मोबाईल त्याच्या चपला बूट काय असेल ते त्याचे शरीराचे शीर, दोन्ही हात, एक पाय, एक अर्धा पाय हे अवयव विहिरीत आढळून आलेले
18 ते 22 वयाच्या या कवळ्या देहाची निर्घुण पणे हत्या करणे या मागचे कारण काही असो परंतु एवढी क्रूर हत्या करणे हे मात्र माणूस केला काळीमा वाचण्यासारखे आहे.
एकीकडे राज्यात बीड येथील संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण व त्यांची झालेली निर्घुण हत्या त्याचे व्हिडिओ फोटो पाहून पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशही गहिवरला होता. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा शिरूर श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर एका तरुणाची हत्या अतिशय निर्घुण पणे झाली. हे एक पोलीस खात्याला आव्हानच म्हणावे लागेल.
एवढा मोठा प्रकार होऊनही आज पर्यंत 24 तास उलटल्यानंतरही श्रीगोंदा, अहिल्यानगर मधील लोकप्रतिनिधी गप्प आहे. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे हा तरुण सात मार्च पासून बेपत्ता आहे. त्याची मिसिंग फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनला दाखल आहे.त्याच्याच दाणेवाडी गावात असणाऱ्या विहिरी तरुणाता मृतदेह सापडला परंतु मृतदेहाची अवस्था त्याला शीर,दोन्ही, हात, एक पाय नाही त्यात तो पाण्यात असल्याने मृतदेह विद्रूप झाला आहे.
मृतदेहाचे वय पाहता त्याची शरीरयष्टी पाहता तो आपल्याच मुलाचा असावा असा कयासही गव्हाणे कुटुंबांचा आहे. परंतु मन म्हणते की तो माझ्या मुलाचा नाही. म्हणून व पूर्ण मृतदेह नसल्याने कुटुंब ही द्विधा मनस्थितीत आहे.
अतिशय क्रूरपणे या तरुणाची हत्या झाली आहे. तरुणाची ओळख पटविणे. हत्येचे कारण व कोणत्या अत्याधुनिक हत्यारांनी ही हत्या केली हे शोधणे आज तरी बेलवंडी पोलीस स्टेशन व अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्यापुढे एक आव्हानच आहे.