शिरूर तालुक्यात पुणे नगर महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या ६ जणांच्या टोळीला शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पकडले असून त्यांच्याकडून १० लाख दोन हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली तर आरोपींनी पाच डिझेल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता त्यांना दहा मार्च पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
याप्रकरणी सुनिल रामचंद्र दुबे(वय ३५ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर पुणे), सुभाष दगडू मालपोटे( वय ४३ वर्षे, रा. कातरखडक, ता. मुळशी, जि.पुणे), संदिप तुळशिराम वाघमारे(वय २३ वर्षे, रा.खांबोली, ता. मुळशी, जि.पुणे), ओंकार शिवाजी घाडगे (वय २२ वर्षे, रा.जोगेश्वरी कॉलनी, काळेपडळ, म्हसोबा मंदिरा शेजारी, हडपसर पुणे), कुणाल सोमनाथ पवार (वय २७ वर्षे, रा. माळवाडी, सुजलोन कंपनी शेजारी, हडपसर पुणे), गणेश भाऊसाहेब मुरकुटे (वय ४६ वर्षे, रा.शिरसवडी, ता. हवेली, जि.पुणे) या ६ आरोपींना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर संभाजी थोटे, (रा.पायतळवाडी, ता. माजलगाव, जि.बीड) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी ज्ञानेश्वर थोटे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर परिसरामध्ये कासारी फाटा येथे त्यांनी त्यांचा ट्रक उभा केला असता विना नंबरची स्विफ्ट कार मधून आलेल्या तिघा जणांनी त्यांच्या ट्रकवर दगडफेक करून खाली उतरला तर याद राख असा दम दिला व त्यांच्या ट्रकमधील 470 लिटर डिझेल चोरून घेऊन गेले होते. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती. या अगोदरही शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत स्विफ्ट कार व आय ट्वेंटी कार मधून आलेल्या चोरट्यांनी डिझेल चोरी केल्याचे गुन्हे दाखल होते. या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला उघडीस आणण्याचे आदेश दिले होते.त्याप्रमाणे शिकापुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपासाव्दारे आरोपींचा शोध घेतला. परंतु आरोपी हे नेहमी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करीत असल्याने त्यांचा शोध घेणेकरीता पोलीसांना अडचणी निर्माण होत होत्या. परंतु गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांनी यापुर्वी ज्यावेळी डिझेल चोरी होत होती, त्यावेळच्या गस्तीमध्ये वाढ करून संशईत स्विफ्ट कार व आय २० कारचा शोध घेतला असता, कोरेगाव भिमा गाव येथे विना नंबरची स्विफ्ट कार संशईत रित्या फिरत असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने सापळा लावुन संशईत विना नंबरची स्विफ्ट कार व त्यामधील तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी डिझेल चोरी केल्याची कबुली दिली त्यांनी चोरलेले डिझेल विक्री करण्यासाठी मदत करणारी व घेणारे यांची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वरील सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ स्विफ्ट कार, १ आय २० कार, ३५ लिटर मापाचे १५ प्लॅस्टिक कॅन, २ हिरवे पाईप असा एकुण दहा लाख दोन हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर प्रशांत ढोले, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहाय्यक फौजदार लहानु बांगर, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, पोलिस कॉन्स्टेबल नारायण वाळके यांचे पथकाने केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करीत आहे .