कारेगाव ता. शिरुर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन तिला घरी बोलावून दमदाटी जातीवाचक शिवीगाळ करीत अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारेगावात सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने नक्की कारेगावात चालले काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.
अल्पवयीन मुलगा(रा. मल्हार हिल्स कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे कारेगाव ता. शिरुर येथील पंधरा वर्षीय युवतीशी अल्पवयीन मुलगा याने सोशल मिडियातून ओळख निर्माण करुन युवतीशी जवळीक निर्माण करुन युवतीला त्याच्या घरी बोलावून घेत युवतीवर बलात्कार केला, त्यांनतर युवतीला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत तू कोणालाही सांगितले तर जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली त्यांनतर युवतीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला, तर युवतीच्या आईने याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अल्पवयीन मुला विरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले हे करत आहे.