कोरेगाव भिमातील कंपनीत बिबट्या शिरल्याने खळबळ
वनविभागाच्या चौकशीनंतर बिबट्या बाहेर गेल्याचे निष्पन्न
शिरूर
(प्रतिनिधी ) कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील किऑन कंपनी आवारात रात्रीच्या सुमारास एक बिबट्याचा वावर सुरक्षारक्षकांना पाहिला आणि कामगारांमध्ये खळबळ व भीतीचे वातावर तर याबाबतची घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाल्याने खळबळ उडाली मात्र वनविभागाच्या तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर बिबट्या झाडावरुन बाहेर गेल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील किऑन कंपनीमध्ये रात्रीच्या एक वाजण्याचा सुमारास एक बिबट्या कंपनीत आल्याचे सुरक्षारक्षकांना दिसले, याबाबतची घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद सुरक्षारक्षकांनी याबाबतची माहिती कंपनी व्यवस्थापकांना दिली, तर सकाळच्या सुमारास कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली दरम्यान घटनेची वनविभागाला माहिती देताच सकाळच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे, प्रमोद पाटील, वन्यजीव बचाव पथकाचे गणेश टिळेकर, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, श्रीकांत भाडळे यांनी घटनास्थळी धाव घेत कंपनीमध्ये सर्वत्र पाहणी करत कंपनी व्यवस्थापक व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वत्र पाहणी करत कंपनीतील सर्व सीसीटीव्ही तपासले असता ज्या ठिकाणी बिबट्याचे शेवटचे ठिकाण सीसीटीव्हीमध्ये दिसले तेथे कंपनीचे व्यवस्थापक रमेश नरवडे, दिलीप भंडारे आदींच्या उपस्थितीत जात पाहणी केली असता बिबट्याने कंपनीच्या सुरक्षाभिंतीच्या कडेला असलेल्या एका झाडावरुन बाहेर उडी मारून धूम ठोकल्याचे उघड झाले तर बिबट्या झाडावरुन गेल्याने झाडावर बिबट्याच्या पावलांच्या नखांचे निशाण दिसून आले, तर कंपनी व्यवस्थापक व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याने कंपनीच्या बाहेर गेल्याचे निष्पन्न झाल्याने कामगारांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान कंपनी कामगारांसह परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांनी केले आहे.
फोटो खालील ओळ – कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे कंपनीतील बिबट्याच्या शोधार्थ वनविभागाचे पथक.
सोबत – कंपनी मध्ये आलेला बिबट्या
.