शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी असल्याने शहराला दिवसा आड पाणीपुरवठा सुरू केला आहे. या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे पाण्याचा अपव्य करणाऱ्या नागरिकांवर शिरूर नगरपालिकेच्या पथकाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर यांनी दिली.
वाढती उष्णता व पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्याची पाण्याचा साठा कमी होत आहे. पाणीसाठा कमी झाल्याने शिरूर शहराला गेली दोन दिवसा पासून पाणीपुरवठा दिवसा आड सुरू केला आहे.
लवकरच नगर परिषद कोल्हापूर बंधाऱ्यात ६१ नंबर वितरिकेतून दोन महिने पुरेल एवढा पाणी साठा प्राप्त होणार आहे .
पाणी पूरवठ्याबाबत शिरूर नगरपरिषद सतर्क झाली असून, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांची शिरूर नगर परिषद पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, लिपिक भूषण कडेकर यांनी भेट घेतली असून, शिरूर शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नंबर चारी मधील पाणी सोडण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली असून 23 मार्चपासून या वि कोल्हापुरी बंधाऱ्यात ६१ नंबर वितरिकेतून पाणी सोडण्याची तजबीज होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु यंदाचा कडक उन्हाळा यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी लवकरच कमी होत आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शिरूर शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, शहरामध्ये पाणीपुरवठा सुरू असताना नागरिकांनी पाण्याचा अपव्य टाळावा, पाणी वाया जाऊ नये याकडे लक्ष द्यावे , रस्त्यावर अंगणात पाणी मारू नये. विनाकारण पाणी आहे म्हणून तोट्या चालू ठेवू नये जेणेकरून पाणी वाया जाईल,नव्याने सुरू असलेले बांधकामे थांबवावीत , पाण्याचा अपव्यय करताना नागरिक आढळून आल्या त्यांच्यावर नगर परिषदेच्या पथकाच्या वतीने पाण्याचा अपव्य करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर यांनी दिला आहे.