शिरूर दिनांक प्रतिनिधी
न्हावरे ता.शिरूर रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी साखर संकुलन येथे झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पात तीस कोटीची तरतूद करण्यासाठी संचालक मंडळाचा प्रस्ताव पाठवावा असे सांगितले असतानही कारखान्याची चेअरमन व माजी आमदार यांनी दोन महिने होऊनही अद्याप पर्यंत प्रस्ताव पाठवला नाही त्यामुळे कारखाना आम्हाला चालू करायचा आहे परंतु माजी आमदार अशोक पवार व घोडगंगा चे चेअरमन ऋषीराज पवार खोडा घालत असल्याचा आरोप घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक सुधीर फराटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
या पत्रकार परिषदेला घोडगंगा कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगाची संचालक सोपान गवारे, शेलार उपस्थित होते.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर आजपर्यंत 315 कोटी रुपयांची कर्ज आहे त्यापैकी
१५७ कोटी बँकांची कर्ज ,४४ कोटी सप्लायर्स देणे, ४२ कोटी साखर व्यापारी व इतर अठरा कोटी, ४८ लाख कामगार पगार, २९ कोटी सभासद ठेव, १३ कोटी विज बिल सात कोटी पाणीपट्टी ग्रामपंचायत कर दोन कोटी पाच, कोटी टीडीएस थकबाकी दोन कोटी जीएसटी थकबाकी दोन कोटी पीएफ थकीत थकबाकी ३९ लाख, 2022 ला झालेल्या निवडणुकीचा खर्च थकीत २८ लाख, पीएसआय व इतर वर्गणी देणे असे जवळपास ३१५ कोटी रुपये देणे व थकबाकी आहेत.
साखर आयुक्त प्रादेशिक सहसंचालक पुणे विभाग यांनी अनेक वेळा एन सी डी सी साठीचा कर्ज प्रस्ताव घोडगंगा कारखान्याकडे मागितला असून, जाणीवपूर्वक कारखान्याची चेअरमन व संचालक मंडळ प्रस्ताव देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे घोडगंगा कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय संचालक मंडळ नियमावे अशी प्रमुख मागणी आमची राज्य सरकारकडे आहे .
९ जानेवारी २५ रोजी साखर संकुल येथे झालेल्या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजित पवार सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके, एम एस सी बँकेचे मुख्य प्रशासक अनास्कर, साखर आयुक्त , सहकार आयुक्त तावरे, प्रादेशिक सहसंचालक गायकवाड , तालुकाध्यक्ष रवी काळे, दादापाटील फराटे, घोडगंगेचे चेअरमन ऋषीराज पवार,सुधीर फराटे ,शशिकांत दसगुडे, राहुल पाचर्णे ,सोपान गवारे, राजेंद्र कोरेकर, स्वप्निल ढमढेरे, स्वप्निल गायकवाड ,श्रीनिवास गाडगे, महेश ढमढेरे यांच्या समवेत घोडगंगा कारखान्या संदर्भात चालू कसा करायचा याबाबत सविस्तर बैठक झाली. परंतु बैठकीत ठरल्याप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पात तीस कोटी रुपये मदतीची घोडगंगा साठी तरतूद करण्याचे ठरले परंतु संचालक मंडळांनी तसा ठराव दिलेला नाही. त्यामुळे बजेटमध्ये पैसे मिळाले नाहीत .
कारखाना सलग दोन गळीत हंगाम बंद असून आगामी हंगामात चालू होणं गरजेचे आहे. कारखान्याची माजी संचालक सुधीर फराटे व संजय पाचंगे यांच्या तक्रारीनुसार कलम 89 अंतर्गत संचालक मंडळाच्या कारभाराची तपासणी झाली असून संचालक मंडळ जोशी सिद्ध झाले आहे कारखान्याचे ऑडिटर दिलीप फडणीस व संचालक मंडळ यांनी चुकीचे दिशाभूल करणारे वार्षिक अहवाल व ताळेबंद प्रसिद्ध केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऑडिटर फडणीस यांना ब्लॅक लिस्ट करून त्यांच्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून कारवाई करण्यात आलेली आहे .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने कारखान्याची 31 डिसेंबर 2024 अखेरची आर्थिक परिस्थिती तपासण्या करता सी ए वझे सीए यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या अहवालानुसार जवळपास 315 कोटींची कर्जे व देणे कारखान्यावर असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सुधीर फराटे यांनी सांगितले.
कारखाना चालू करण्यासाठी जवळपास 300 कोटी रुपये रकमेची आवश्यकता असून शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या मागणीनुसार सदर रक्कम एनसीडीसी मार्फत देण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मान्य केले आहे. परंतु घोडगंगाचे चेअरमन माजी आमदार अशोक पवार व संचालक मंडळ जाणीवपूर्वक सदरचा प्रस्ताव देण्यास टाळा टाळाटाळ व विलंब करत आहेत यातून अशोक पवारांनाच घोडगंगा कारखाना चालू होऊ द्यायचा नाही असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत असल्याचे बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले.
९ सप्टेंबर २४ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घोडगंगाच्या सर्व आजी-माजी संचालकांना कर्ज एनपीए झाल्यामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त करत असल्याचे लेखी कळविले होते परंतु तदनंतर जवळपास सहा महिने संचालक मंडळाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सहा मार्च 2025 रोजी बँकेने कारखान्याची सर्व मालमत्ता ताब्यात घेतली असल्याचे कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे यांनी सां
गितले.