पोलिसांनी गांभीर्याने तपास करण्याची शेतकऱ्यांची मागणी
शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथील घोडनदी पात्रात शेतीसाठी पाणी घेणाऱ्या एकाच दिवशी ५ विद्युत मोटारी व केबल असा एकूण ७० हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात असून आता चोरट्यांनी विद्युत रोहित्रनंतर शेतकऱ्यांच्या विद्युत पंप व केबल याकडे लक्ष केले आहे.
याबाबत भाऊसाहेब चंदर दाते (वय 42 वर्षे व्यवसाय शेती रा. रावडेवाडी ता. शिरूर जि. पुणे) व
निमगाव दुडे (ता.शिरुर) परिसरातील प्रभाकर गेणभाऊ रावडे, शिवनाथ गेणू रावडे, दशरथ रामभाऊ शिंदे, सुमित भानुदास कांदळकर यांनी फिर्याद दिली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पूर्ण प्रमाणे दिनांक 12 मार्च दुपारी अडीच ते 13 मार्च सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान निमगाव दुडे ता. शिरूर येथील घोडनदी पात्रात शेतकऱ्यांनी शेतीला पाणी घेण्यासाठी लावलेल्या पाच शेतकऱ्यांच्या विद्युत पंप व केबल असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयानी चोरून नेला आहे.
याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उबाळे करीत आहे.
बी बियाणे, खते, औषधे, डिझेल, पेट्रोलचे वाढलेले बाजारभाव त्याचबरोबर पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष , विजेचा सततचा लपंडाव, सातत्याने बदलणारे हवामान , बिबट्याची दहशत अशा सर्वच बाजुंचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत.आणि अशा परिस्थितीत भुरट्या चोरांचा शेती साहित्य चोरण्याचा उपद्रव सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.