करंदीत शेतकऱ्याला चारशे टन ऊस उत्पादनाचा आनंद
शेतकऱ्याने चक्क डीजेच्या तालावर ऊस नेला कारखान्यावर
शिरूर ( प्रतिनिधी ) आजपर्यंत आपण डीजे फक्त लग्नाच्या वरातीत, मिरवणुकीत, उत्सवात पाहिला असेल, परंतु पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील करंदीतील एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने चक्क शेतातून ऊस तोडून थेट डीजेच्या तालावर नाचत वाजत गाजत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर सजवून ऊस कारखान्यावर नेला असल्याने कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्याचा सन्मान करत स्वागत केले आहे.
करंदी ता. शिरुर येथील शेतकरी दत्तात्रय सोनवणे यांनी शेतामध्ये ऊस पिकवून शेतीकडे लक्ष केंद्रित करुन पाच ते सहा एकर क्षेत्रातून तब्बल चारशे टन ऊसाचे उत्पादन घेतले सदर शेतातून शेवटचा ट्रॅक्टर भरून नेत असताना दत्तात्रय सोनवणे यांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर सजवून ट्रॅक्टरची ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजा करत चक्क डीजे लावून वाजत, गाजत ऊस व्यंकटेश कृपा शुगर मिल्स या कारखान्यावर घेऊन जात जल्लोष केला आहे, दत्तात्रय सोनवणे यांच्या अनोख्या पराक्रमाची सध्या मोठी चर्चा होत असून कारखान्यापर्यंत वाजत गाजत नेला त्यामुळे तालुक्यात या ऊस उत्पादक शेतकऱ्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर सध्या कारखान्याचा गाळप हंगामाचा शेवट जवळ आलेला असताना शेतकऱ्याने केलेल्या या अनोख्या लक्षवेधी उपक्रमाचे व्यंकटेश कृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याचे सुनील कदम यांनी कौतुक करत ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आभार मानले आहे. तर सध्या शिरुर तालुक्यांसह पुणे जिल्ह्यात दत्तात्रय सोनवणे या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या कार्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
फोटो खालील ओळ – करंदी ता. शिरुर येथून डीजेच्या तालावर ऊस कारखान्यात घेऊन जाताना शेतकरी.