खरेदी विक्री संघ सभापती उपसभापती निवडणुकीत कटके गड राखणार का ? पवार आसमान दाखवणार ? याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या २०२४/२५ ते २०३० या पंचवार्षिक साठी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली असून आता विधानसभेनंतर होणाऱ्या पहिल्या सहकार क्षेत्रातील शिरूर तालुक्यातील या निवडणुकीत विद्यामान आमदार माऊली कटके गड राखणार का ? माजी आमदार ॲड अशोक पवार आसमान दाखवणार याकडे संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अतिशय चुरशीची झालेली ही शिरूर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक या निवडणुकीमध्ये आमदार माऊली कटके, राष्ट्रवादीचे मानसिंग पाचुंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्निल गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र जासूद, घोडगंगा च माजी संचालक दादा पाटील फराटे, दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे ,माजी बाजार समिती अध्यक्ष शशिकांत दसगुडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत संचालक मंडळाच्या उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी त्याचे जवळपास १० उमेदवार बिनविरोध करून गड राखला. तर माजी आमदार अशोक पवार यांनी केवळ दोन उमेदवार बिनविरोध करण्यात यश आले. त्यानंतर दिनांक नऊ मार्च रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पाचही जागेवर आमदार अशोक पवार यांच्या विचाराचे उमेदवार निवडून आल्याने निवडणुकीत त्यांनी सरशी केली.
त्यामुळे विद्यमान आमदार माऊली कटके यांच्याकडे दहा संचालक तर माजी आमदार अशोक पवार यांच्याकडे सात संचालक असे बलाबल राहिले अशी चर्चा झाली.
त्यानंतर खरेदी विक्री संघाच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत नक्की कोणाकडे संख्याबळ राहील हे त्या दिवशीच कळेल असेही दोन्ही गटाकडून सांगण्यात आले.
या निवडणुकी अगोदर माजी आमदार अशोक पवार यांना मोठा धक्का बसला होता त्यांचे विश्वासू खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र नरवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतरही उशिरा या निवडणुकीत लक्ष घालू पवार यांनी खरेदी विक्री संघाच्या पाच जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये आपले पाचही उमेदवार निवडून आणले. त्यामुळे २४ मार्च रोजी होणाऱ्या खरेदी-विक्री संघाच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे.
शिरूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्याच होणाऱ्या तालुका खरेदी विक्री संघाच्या या निवडणुकीत आता सरशी कोणाची होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत जो खरेदी-विक्री संघावर राज्य करेल तो येणाऱ्या बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत आपली ताकद वाढवणार व यामुळे वाढणार हे नक्की आहे.
*******************************************
शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार दिनांक २४ मार्च २५ रोजी नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीच्या प्रथ सभेत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी दिली आहे. यावेळी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक आर डी संकपाळ उपस्थित राहणार आहे.
नुकतीच खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक नऊ मार्च २५ रोजी झाली असून या निवडणुकीत १७ संचालकांची निवड झाली आहे.
या तालुका खरेदी विक्री संघाची सभापती व उपसभापती पदाचे निवडणुकीसाठी सहाय्यक निबंध अरुण साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सभापती व उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे.
दिनांक २४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत खरेदी विक्री संघाच्या कार्यालया येथे ही निवड होणार आहे.
सकाळी ११:०५ ते ११:३० सभापती उपसभापती पदाचे नामनिर्देशन अर्ज घेणे व दाखल करणे.सकाळी ११:३० ते ११:४५ आलेल्या नामनिर्देशात अर्जाची छाननी.
त्याच वेळी नामनिर्देशन अर्जाची माघार घेणे सकाळी ११:५० ते दुपारी १२:२० वाजेपर्यंत. मतदान दुपारी १२:३० ते १ वाजेपर्यंत. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सभेचे अध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी अरुण साकोरे यांनी सांगि
तले.