रांजणगावात गोडाऊनची भिंत कोसळली आणि सात लाख ३५ हजाराची साखर पोती नागरिकांनी पळवली
शिरूर,प्रतिनिधी
रांजणगाव एम आय डी सी मधील पिव्ही सन्स कंपनी जवळील अग्रवाल यांच्या गोडाऊनची भिंत कोसळून बाहेर पडलेली ५० किलो वजनाची ३९२
साखरेची पोती किंमत ७ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे साखरेची पोती रस्त्याने येणाऱ्या जाणारे नागरिकांनी चोरून नेले आहेत.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अक्षय कोंडीराम कटके (वय.२४ रा. इंदीरा चौंक निलंगा ता. निलंगा जि. लातुर ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दि. १० फेब्रुवारी २५ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान दि. ११ फेब्रुवारी 25 रोजी रात्री दीड च्या सुमारास रांजणगाव एम आय डी सी मधील पिव्ही सन्स कंपनी जवळील अग्रवाल यांचे साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाचे गोडावुन आमचे कंपनीचे नॅशनल बल्क हँडलींग कापोरेषन प्रा.ली. कंपनीचे ताब्यात आसणारे मधून रचलेली पोती अचानक ढासळुन बाजुचे भिंतीवर पडुन भिंत पडुन पोती बाहेर रोडवर गेलेने रोडने येणारे जाणारे अज्ञात लोंकानी सदर ठिकाणावरून ५० किलो वजनाची एकुन ३९२ साखरेची पोती किंमत ७ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज या रस्त्याने येणाऱ्या जाणारे लोकांनी चोरून नेला आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आ
हे.