कंटेनर-कारची धडक : मृतांमध्ये बाप-लेकीसह मामाचा समावेश
शिरूर तालुक्यातील न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर न्हावरे सरके यांच्या घराजवळ भरधाव कंटेनरने स्विफ्ट कारला समोरून जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये बाप लेकीसह मामाचा समावेश आहे.
कैलास कृष्णाजी गायकवाड (वय ५०), गौरी कैलास गायकवाड (वय २० दोघे रा. निंबाळकर वस्ती न्हावरा ता. शिरूर),गणेश निर्लेकर (४० रा. कोकगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) अशी मृतांची नावे आहेत. दुर्गा गायकवाड या गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत रविंद्र महादेव सोनवणे( रा कुटेवस्ती, न्हावरे ता शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनाक 23/3/2025 रोजी रात्री 19.30 वाजण्याच्या सुमारास न्हावरे ता. शिरूर जि कैलास गायकवाड हे त्याचे ताब्यातील पांढरे रंगाची स्वीप्ट कार गाडी नंबर एम.एच.16 सी. व्ही. 4176 मध्ये त्याची पत्नी दुर्गा कैलास गायकवाड मुलगी गौरी कैलास गायकवाड व मेव्हणे गणेश महादेव नेर्लेकर याना बसवून ते वाघोली पुणे येथून न्हावरे कडे येत असताना ते तळेगाव ढमढेरे ते न्हावरे रोडने संदिप महादेव सरके यांचे घराशेजारी रोडवर आल्यावर समोरून न्हावरे बाजुकडून तळेगाव कडे जाणारा कटेनर ट्रक नं एन. एल. 05 जी 2396 वरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील कटेनर भरधाव वेगात वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून चालवून समोरून येणारे स्वीफ्ट कारला जोरात धडक
देऊन अपघात करून अपघातात कार चालक दिली हा अपघात एवढा जबरदस्त होता की यात कैलास गायकवाड त्यांची मुलगी गौरी, मेहुणे गणेश नेर्लेकर यांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्गा कैलास गायकवाड या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाता नंतर कंटेनर चालक पळून गेला आहे. फिर्यादीवरून शिरूर पोलिस स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भोते करीत आहे.