शिरूर शहरात पोलिसांचे पथसंचलन.... नागपूर हिंसाचार व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क
शिरूर प्रतिनिधी
नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराचे घटना व ईद सणाच्या अनुषंगाने शिरूर शहरामध्ये कुठलाही अनुचितप्रकार घडू नये यासाठी शिरूर पोलीस सतर्क झाले असून शिरूर शहरातून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथसंचलन केले असून सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे.
. सदर पोलिस पथसंचलन हा पोलिस स्टेशन-बीजे कॉर्नर,पाचकंदील चौक, सुभाष चौक, एस स्टँड , इंदिरा गांधी पुतळा ,विद्याधाम शाळा, बीजे कॉर्नर,तहसील कार्यालय पोलीस स्टेशन मार्गे घेण्यात आला.
सदरचा पथसंचलन करीता शिरूर पोलीस स्टेशन मधील ४ पोलीस अधिकारी व ३० पोलीस अंमलदार हजर होते.
नागपुर येथे घडलेल्या हिंसाचाराचे घटनेच्या अनुषंगाने व येणारी ईद हा मुस्लिम बांधवांचा सण यानिमित्त शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने हिंदू मूर्ती समाज, मुस्लिम समाज व शांतता कमिटीची सदस्य यांची बैठक घेण्यात आली होती.
. सदर बैठकीमध्ये तरुणांना सोशल मीडियावर भडकाऊ संदेश पोस्ट टाकु नये, इतर वाद्रग्रस्त संदेश हे शेअर करू नये अथवा त्यावर कमेंट करू नये. राजकीय सामाजिक व धार्मिक जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही गैरकृत्य कोणाकडुन होणार नाही याची काळजी घेणेबाबत सर्वानापोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सूचना दिल्या आहेत.