शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापती पदी राजेंद्र नरवडे उपसभापती पदी बाळासाहेब नागवडे बिनविरोध

9 Star News
0

 शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापती पदी राजेंद्र नरवडे उपसभापती पदी बाळासाहेब नागवडे बिनविरोध  


शिरूर प्रतिनिधी 

          शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापती पदी महायुतीचे राजेंद्र नरवडे तर उपसभापती पदी बाळासाहेब नागवडे यांची बिनविरोध निवड झाली असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी घोषित केले. चेहरे तेच फक्त पक्ष बदल असेच म्हणावे लागेल.

          खरेदी विक्री संघात महायुतीचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे माजी आमदार अशोक पवार यांच्या चार सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी आमदार अशोक पवार यांच्या पक्षाला पुन्हा एकदा सुरुंग लागला आहे.

          आज दिनांक 24 मार्च रोजी खरेदी विक्री संघाच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सकाळी 11 ते साडेअकरा पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्याकडे सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी संचालकांनी आपला उमेदवार अर्ज दाखल करायचा होता. यावेळी सभापती पदासाठी राजेंद्र नरवडे तर उपसभापती पदासाठी बाळासाहेब नागवडे या दोघांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषित करण्यात आली. 

            ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष अण्णा महाडीक यांनी बंद लिफाफ्यात दोन नावे आणली होती त्यानुसार शिरूर तालुका खरेदी विक्री संघाची सभापतीपदी राजेंद्र नरवडे तर उपसभापती पदासाठी बाळासाहेब नागवडे यांचे नाव या लिफाफ्यात आले .

          ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, राष्ट्रवादी युवक चे माजी जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, मानसिंग पाचुंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे,जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे, बाजार समितीचे माजी संचालक आबाराजे मांढरे, राजेंद्र गावडे, भाजपा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे,बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार,पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे , राजेंद्र कोरेकर,माजी सभापती शरद कालेवार ,माजी सरपंच प्रकाश थोरात , श्रीनिवास घाडगे , शृतिका झांबरे या नेत्यांनी परिश्रम घेतले.

           हि निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सर्व नेत्यांनी माजी आमदार अशोक पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. तर या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीनंतर माजी आमदार अशोक पवार यांच्या जवळचे समजणारे चार उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.    

       व शिरूर तालुका आता खऱ्या अर्थाने दहशतमुक्त झाला असून या पुढील काळात येणाऱ्या बाजार समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकत्र राहून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व मोठा भाऊ असणारा भारतीय जनता पक्ष मधला भाऊ शिवसेना एक दिलाने काम करून महायुतीचा झेंडा या संस्थेवर लावायचा असा निर्धारही यावेळी करण्यात आला. 

           या निवडणुकीत निवडणुकीच्या दिवशी सभापती कोण व उपसभापती कोण अहे निवडणुकी दिवशी समजेल अशी भीम गर्जना करणारे माजी आमदार अशोक पवार यांनी आपली तलवार म्यान का केली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काळे यांनी करून या पढील काळात तुम्हाला व तुमच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले लोक तुम्हाला सोडून जातील असे सांगून या पुढील सर्व निवडणुकीत महायुतीचा झेंडा लागणार आहे असेही आमदार पवार यांना सुनावले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!