शिरूर तालुका श्रीगोंदा तालुक्याचे शिवेवर दाणेवाडी ता. श्रीगोंदा या ठिकाणी 18 ते 22 वयाच्या अनोळखी तरुणाता मृत्युं विहिरी मध्ये आढळून आला आहे. बीडच्या मस्साजोग नंतर शिरूर श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवरही दाणेवाडी ता श्रीगोंदा.येथे घडला निर्घुण खून.. तरुणाचे शीर धडा वेगळे दोन हात एक पाय तोडले तर एक पाय अर्धवट तोडला... नग्न अवस्थेतील मृतदेह विहिरीत टाकलेला आढळून आला आहे.
या मृतदेहाचे शीर दोन हात व एक पाय नसल्याचे दिसून आले आहे. तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणा ही आढळून आले आहे. यामुळे शिरूर व श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हा मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी येथील महाविद्यालयीन तरुणाचा असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
जीवाचा थरका उडवणारा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट उडाली.
मृतदेहाचे शीर दोन्ही हात व पाय सापडलेला नाही.
नक्की हा मृतदेह कोणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडी ता श्रीगोंदा येथील माऊली सतिश गव्हाणे हा 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुण ७ मार्च २५पासून बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते अनिल परशुराम गव्हाणे यांनी सांगितले याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
परंतु हा मृतदेह नक्की त्याचा का ?आणखी कोणाचा याबाबत आज तरी शंका आहे.
शिरूर पोलीस स्टेशन येथे आज मिसिंग तरुणाचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली असून, दाणेवाडी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांच्यात मुलाचा असू शकतो .परंतु मृतदेहाचे शीर, दोन्ही हात, उजवा एक पाय नसलेला , डावा पाय अर्धा तुटलेला अवस्थेत सापडल्याने कुटुंबही द्विधा मनस्थिती मध्ये आहे.
. मिसिंग फिर्यादी बाबत चौकशी सुरू असून सीसी टीव्ही कॅमेरे फुटेज जमा करण्याचे काम सुरू आहे. दाणेवाडी येथील मृतदेह बाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग, श्रीगोंदा पोलीस, अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभाग पथके तपासासाठी रवाना झाली आहे.
संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक शिरूर