नशेचा झटका बसणारी पांढरी पावडर जप्त ....
सणसवाडीतील दोन पान शॉपवर शिक्रापूर पोलिसांचे छापे
पुणे नगर महामार्गालगत सणसवाडी परिसरात पान शॉपवर गुंगीकारक पदार्थ टाकून पान बनवले जात असल्याने शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने पान शॉपवर छापे टाकत पान मसाले व पावडर जप्त करुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नशा आणणारी पांढरी पावडर नेमकी काय ड्रग्स का इतर अमली पदार्थ याबाबत शंका निर्माण झाली आहे. एका महिन्यात चार पानांच्या दुकानावर कारवाई.
या अगोदर कासारी फाटा व कोरेगाव भीमा या दोन ठिकाणी अशा प्रकारे शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करून दोघांना अटक केली होती त्यानंतरही शिक्रापूर पोलीस हद्दीत अशा प्रकारे नशेली पान विकणाऱ्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. या नशेली पानासाठी लागणारी पांढरी पावडर पुणे येथून एक मोठा दलाल नगर पर्यंत सप्लाय करत असण्याची चर्चा आहे. परंतु त्याच्यापर्यंत पोलीस पोहचणार का? हा संशोधनाचा विषय आहे.
अशाप्रकारे अमली पदार्थ चे गुन्हे गंभीर असून या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी चर्चा शिक्रापूर परिसरात आहे.
याबाबत पोलिसांनी समर्थ राजे पान शॉपचालक समर्थ हनुमंत कुकर (वय १९ वर्षे रा. सराटेवस्ती सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) व ओम पान शॉप चालक विकास उर्फ सतीशकुमार जगतनारायण सिंग (वय ३६ वर्षे रा. आनंदनगर सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सणसवाडी येथील समर्थ राजे पान शॉप व ओम पान शॉप या दोन पान शॉपवर नशा व गुंगीकारक पद्धतीचा मसाला टाकून पान बनवले जात असून युवकांमध्ये त्याचे जास्त आकर्षण असून शाळकरी व महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणात या पानांच्या आहारी गेलेले असताना सदर पान धोकादायक होऊ शकत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली, त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, विकास पाटील, जयराज देवकर यांनी सणसवाडी येथील समर्थ राजे पान शॉप व ओम पान शॉप या दोन पान शॉप येथे छापे टाकत पाहणी केली असता सदर पान शॉपमध्ये कोणतेही नाव अथवा लेबल नसलेले प्रतिबंधित पान मसाले व पावडर वापरुन पान बनवले जात असल्याचे निदर्शनास आले, दरम्यान पोलिसांनी दोन्ही पान शॉप मधील पान मसाले व पावडर जप्त केले असून दोघाजनांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतही अशा प्रकारे नशेली पान विक्री सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर या पानाची विक्री शिरूर शहर व हद्दीत होत आहे.
परंतु याबाबत नागरिक पोलीस यांच्या बैठकीत सांगूनही या पानांच्या दुकानावर कारवाई का नाही झाली.
नितीन थोरात , शिरूर तालुका समन्वयक किसान क्रांती कृती समिती