गणेगाव खालसा ता. शिरूर येथे उसतोड मजुर पत्नीचा नातेवाईकाच्या लग्नाला येण्यास नकर दिल्यामुळे तिचा खून करून फरार झालेल्या नराधम पतीला रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिले आहे.
याप्रकरणी माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे ( रा,दडपिंपरी, ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय २७ )या महिलेचा तिच्या पतीने खून केला होता.
याबाबत मयत महिलेचा भाऊ ताराचंद सुखलाल मोरे (रा. मणेनाव खालसा ता शिरूर मुळ रा. सिध्दयाडी ता चाळीसनाप जि जळमात) याने
फिर्याद दिली होती.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे गणेगाव खालसा ता शिरूर येथे ऊस तोडणी साठी आलेला माऊली गांगुर्डे याच्या नातेवाईकांची लग्न नाशिक येथे होते या लग्नात जाण्यासाठी त्याची पत्नी मीनाबाईने नकार दिल्याचा राग आल्याने माऊली यांनी पत्नीचा गळा आवळून खून केला होता. तेव्हापासून माऊली गांगुर्डे फरार होता याबाबत पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास केला परंतु तो मिळून आला नाही. सदर खुनातील आरोपीचा शोध घेण्याची आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले होते. आरोपीचा शोध रांजणगाव एमआयडीसी पोलीस पथक करत असताना दिनांक 12 मार्च रोजी सदर आरोपी हा त्याचे मूळ गावी दंडपिंपरी चाळीसगाव येथे येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी लगेचच सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस हवालदार संतोष आवटी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड यांचे पथक तयार करून वेशांतर करून आरोपी येणार असलेले दंडपिंपरी यागावी सापळा रचला आरोपी गावात येत असताना आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी त्याला पकडले..
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाफौज दतात्रय शिंदे, पोलीस हवालदार विजय सरजिने, पोलीस हवालदार संतोष औटी, पोलीस हवालदार संदिप जगदाळे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, उमेश कुतवळ, प्रविण पिठले, किशोर शिवणकर, यांने पथकाने केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे हे करत आहे