वाटाणा सोलण्याचे मशीन व पनीर बनवण्याचा कारखान्यात भागीदारी देतो ते सांगून दोन महिलांची पावणे दोन कोटी रुपयाची फसवणूक
शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथे वाटाणा सोलण्याचे मशीन व पनीर बनवण्याचा कारखाना (प्लांट) टाकणार असून तुम्हाला त्यात भागीदारी देतो असे सांगून दोन महिलांची एक कोटी ८४ लाख ६६ हजार ६५८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविता अशोक मेसे (वय 48 वर्ष, रा. स्वामी छाया फेज 2, फ्लॅट नं 19, विठ्ठल नगर, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सुनिता राहुल भांगे, राहुल नवनाथ भांगे, ऋशी नवनाथ भांगे (रा. केसनंद रोड, वाघोली मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड ) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादीचा फिर्यादीवरून दिनांक १ऑक्टोबर २२ ते १८ मार्च २५ दरम्यान सुनिता राहुल भांगे व राहुल नवनाथ भांगे, ऋशी नवनाथ भांगे (रा. केसनंद रोड, वाघोली मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड)यांनी फिर्यादी यांच्या घरी येउन मला त्यांनी आम्ही वाटाना सोलने व पनीर तयार करण्याचा प्लांट टाकणार आहोत. त्याकरिता आम्हाला पैशांची गरज आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुम्हाला त्या प्लांटमध्ये पार्टनर घेउन त्यामधून येणारा नफा आम्ही तुम्हाला देऊ असे खोटेनाटे सांगून तीन आरोपी यांनी फिर्यादी व त्यांची मैत्रीण यांचा विश्वास संपादन करून त्यांची १ कोटी ८४ लाख ६६ हजार ६५८ रुपये एवढी रक्कम आरोपींनी येऊन फिर्यादी व त्यांची मैत्रीण यांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे तिघां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करीत
आहे.