सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत शिरूर तालुका व शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने वाल्मीक कराड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या नेत्या, प्रवक्त्या ज्योती वाघमारे शिरूर येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर वाल्मीक कराड यांच्या प्रथमेश जोडमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे , उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद , तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे , पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोमे , तालुका संपर्क प्रमुख सारिका पवार , उपतालुका प्रमुख शरद नवले ,संतोष वर्पे , शहर प्रमुख मयूर थोरात , संघटक सुरेश गाडेकर ,प्रमोद महाराज जोशी, सुजाता पाटील ,कविता परदेशी, नयना परदेशी, अण्णा हजारे, प्रिया बिरादार मोनिका राठौड, पूजा काळे , ॲड .शुभम माळी भरत जोशी, सागर गव्हाणे, गणेश गिरे, नीता कटके सुरेखा तोंडे, प्रमोद जोशी, अमोल लुनिया आदी उपस्थित होते .
यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला.
या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेत्या, प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी तयार राहावे त्यासाठी पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री विद्यमान एकनाथ शिंदे तुमच्या मागे ताकद उभी करतील असे आश्वासने यावेळेस त्यांनी देऊन 2029 विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येईल यासाठी आजपासून तयारीला लागा असा सल्लाही शिवसैनिकांना त्यांनी यावेळी दिला. तर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी यावेळी करण्यात आले असून त्यांना निवडीचे पत्रही देण्यात आले.