अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक एकचा विद्यार्थी आरूष अमोल चव्हाण यास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत शिरूर नगरपालिका शाळा क्र. 1 च्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात इयत्ता 2 रीतील विद्यार्थी आरुष अमोल चव्हाण याने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल आरुष च्या वर्गशिक्षिका प्रमिला तळेकर मुख्याध्यापक उषा वेताळ व शिक्षकवृंद आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.
आरुष च्या च्या या यशाने शाळेचे नाव उज्वल केले असून, त्याचा गौरव सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन केला जाणार आहे. व इतर सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाण पत्र देण्यात येणार आहे..
आरुष चव्हाण यास शिक्षिका संपदा राठोड, प्रतिभा आहेर यांनी मार्गदर्शन केले.