शिक्रापुरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हा

9 Star News
0
शिक्रापुरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हा
शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिलांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन दोन महिलांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
                                शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण चौक परिसरात दोन महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली, त्यांनतर सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, महिला पोलीस शिपाई रुपाली निंभोरे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता चाकण चौकातील कृष्णा लॉजिंग समोर दोन महिला शरीराचे प्रदर्शन करुन नागरिकांना अश्लील हावभाव करुन वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसून आले, दरम्यान पोलिसांनी त्या दोन्ही महिलांना ताब्यात घेत चौकशी केली असता सदर महिला वेश्या व्यवसाय करत असल्याचे समोर आले, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई रुपाली बाळासाहेब निंभोरे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!