शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टैंड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधुन फटाके फोडणा-या, कर्कश आवाज करणा-या बुलेट चालकांवर शिरूर पोलिसांनी कारवाई करत ३५ बुलेटचे सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावरून आज बुलडोजर फिरवण्यात आला. शिरूर पोलीस स्टेशनच्या या धडाकेबाज कारवाई की शिरूर तालुक्यातून कौतुक होत आहे.
शिरूर शहरात शाळा कॉलेज परिसरात रस्त्यावर बुलेट राजांची परेल रोज सुरू असते या बुलेट मधून वाजवणारा फटाका व वेगवेगळे कर्कश आवाज यामुळे सर्वसामान्य नागरिक रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे
तर बुलेटच्या कर्कश आवाजामुळे महिला शाळकरी महाविद्यालयीन तरुणी, वृद्ध नागरिक यांना नाकीनऊआले होते.
या कर कशावादाच्या बुलेट सायलेन्सस्वर कारवाई करण्याचे आदेश शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी वाहतुक शाखेला दिले . व कार्यवाहीसाठी वाहतुक शाखेचे पोलिस पथक तयार केले पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे, पोलीस अंमलदार विकी मैंद यांचे पथक तयार केले.
या पथकाने शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टॅन्ड, गर्दीचे ठिकाणी गस्त करून कारवाई करत एकूण ३५ बुलेट मोटारसायकल ताब्यात घेवुन त्यांचे कर्कश आवाज करणारे व बुलेट मधून फटाके फोडणाऱ्या ३५ सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. दिनांक १८ मार्च रोजी वरील जप्त करण्यात आलेल्या कर्कश आवाज करण्या-या ३५ बुलेट मोटारसायकलचे सायलेन्सरवर आज नागरिकांचे समोर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, यांना शिरूर शहरमधील महाविदयालय, शाळा परीसरामध्ये गस्त घालण्याचे आदेश देवुन महाविदयालयीन मुलींच्या अडचणी जाणून घेणे, तसेच रोडरोमीयो यांचेवर कडक कारवाई करण्याबाबत सांगीतले आहे.
शिरूर पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण भागामधील चार चाकी वाहनांचे काळया काचांचे फिल्मींग असल्यावर त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून गाडीच्या काचेचे फिल्मीग जागेवरच फाडण्यात येणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगी
तले आहे.