शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुका श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे १९ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाने लावला असून,हा गुन्हा करणारा दुसरा कोणी नाही तर जिवलग मित्र नातेवाईक असून त्याला ताब्यात घेण्यात अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.
या तरुणाचा खून का? व कशासाठी करण्यात आला व कशाने करण्यात आणखी आरोपी आहेत का ? याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे जिल्हा अहिल्यानगर बरोबर शिरूर तालुका श्रीगोंदा तालुका हादरवून सोडणारा हा माऊली गव्हाणे याच्या खुनाचा तपास अहिल्यानगर पोलीस अधीक्षक ओला व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या सीताफिने लावला याबद्दल दोन्ही जिल्ह्यातून त्यांची कौतुक होत आहे.
सागर दादाभाऊ गव्हाणे ( रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) असे आरोपींचे नाव असून, त्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
माऊली सतीश गव्हाणे या तरुणाचा खून करण्यात आला होता. हा खून इतका क्रूर करण्यात आला होता. या तरुणाचे डोके,दोन हात , पाय असे साह्याने कट करून दाणेवाडी गावातच असणाऱ्या आरोपीच्या घरासमोरील दोन विहिरीमध्ये दोन पोत्यांच्या गाठोड्यात दगड सह टाकले होते.
हे आरोपी इतके शातिर होते की त्यांनी अतिशय शांत डोक्याने हा खून करून अवयव अवयव घराजवळील विहिरीत टाकले आहे.
सदर कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहिल्यानगर अप्पर पोलीस प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अरूण गांगुर्डे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रमोद जाधव, रोहित मिसाळ, अशोक लिपणे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, जालींदर माने, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, महादेव भांड अशांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणला आहे.
परंतु या तरुणाचा मृतदेह सापडल्यापासून पोलिसांना कुठलाही असा ठोस् पुरावा पोलिसांना मिळत मिळत नव्हता. परंतु तरुणाचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे त्याच्या घराजवळच होते व तेथेच त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्यामुळे तपास करणारे पोलीस चक्रावले होते आरोपीने कुठलाही क्यू ठेवला नव्हता. परंतु हा गुन्हा जवळच्या माणसाने केला असल्याचा त्यांचा कयास होता. कानून के हाथ बडे लंबे होते त्या म्हणी प्रमाणे अखेर पोलीस आरोपीच्या पर्यंत पोहोचले आणि या खुनाचा उलगडा करण्यात अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाला यश आले आहे.