शिरूर,प्रतिनिधी
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर समाजात आपल्या कामाचा ठसा उमटवणऱ्या ८ महिलांना शिवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा शिवसेनेच्या संपर्क प्रमुख गीतांजली ढोमे , पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, ऊस तोड कामगार संघटनेच्या नेत्या स्वातीताई मोराळे,
शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार , मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , तालुका संघटक सुरेश गाडेकर , महिला आघाडीच्या सुजाता पाटील , पूजा काळे, अमोल लुनिया, लांडे,अध्यात्मिक आघाडीचे प्रमोद महाराज जोशी , भरत जोशी आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमात आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे,
हॉटेल व्यवसायिका सुलोचना रामदास गिरमकर, ,वात्सल्यसिंधू फाउंडैशनच्या उषाताई शैलैश वाखारे , , जिम चालक व हॉटेल व्यवसायिका प्रिया बिरादार , सोशल गृपच्या कामिनी बाफना , ॲड . सोनाली अच्छा , पोलीस कॉन्स्टेंबल प्रतिभा देशमुख , डॉ . किर्ती मदने या महिलांचा सन्मान शिवदुर्गा पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला .
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख गीतांजली ढोमे म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणूकीनुसार महिलांचा सन्मान करणे व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महिलांचा शिवदुर्गा पुरस्कार देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे .
शिरुर शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावची शिकवण दिली .नामदेवराव घावटे यांचे ही भाषण झाले .स्वागत व प्रस्ताविक शहरप्रमुख मयूर थोरात यांनी केले . सुरेश गाडेकर यांनी आभार मानले .